मोरबे धरणाच्या पाण्यात काल दुपारी दोन मृतदेह आढळून आले होते. यात एक महिला आणि एक पुरुष यांचा समावेश होता. सुरवातीला ही आत्महत्या असल्याचा अंदाज वर्तविला जात होता. मात्र दोघांचाही खून करून मृतदेह पाण्यात टाकल्याची बाब समोर आली आहे. यानंतर आता या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून खालापूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

खालापूर तालुक्यातील मोरबे धरणात वरोसेवाडी गावच्या हद्दीत दोन मृतदेह आढळून आले होते. सुरवातीला ही आत्महत्या असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलसींनी केलेल्या प्राथमिक तपासात दोघांचाही खून झाल्याची बाब समोर आली आहे. दोघांची तीक्ष्ण हत्याराने डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार करून ही हत्या करण्यात आली आहे. यानतर पुरावा नष्ट करण्यासाठी दोघांचेही मृतदेह धरणात टाकून देण्यात आले असल्याची बाब समोर आली आहे. यानंतर पोलीसांनी अज्ञात इसमाविरोधात भादवी कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : “आरएसएच्या कार्यालयातील शस्त्रांकडे एनआयए डोळेझाक करते”, एसडीपीआयचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान या घटनेनंतर अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, आणि खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांनी घटनास्थळाला भेट देऊन पहाणी केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश त्यांनी पोलीसांना दिले आहेत.पोलीस निरीक्षक कुंभार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.