राज्य सरकारने उसाची एफआरपी दोन टप्प्यात देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. एकरकमी एफआरपी देण्याची मागणी फेटाळून लावली आहे. यामुळे राज्य सरकार विरूध्द आरपारची लढाई लढणार असून याविरोधात मोठे जनआंदोलन उभे करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोमवारी दिला आहे.

“उसाची एफआरपी दोन टप्प्यात देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने विश्वासघात करून घेतला आहे. त्यावर पुर्नविचार करण्यासाठी मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकारमंत्री, साखर आयुक्त तसेच संबंधित खात्याचे सचिव यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. राज्य सरकारला एफआरपी दोन टप्प्यात देण्याचा अधिकार नसल्याने ती एकरकमी देण्याची मागणी केली होती. सहकार विभागाचे मुख्य सचिव अनुपकुमार यांनी  पत्वाद्वारे कारखान्यांच्या बाजूनेच राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करत एफआरपी दोन टप्प्यातच दिली जाणार असल्याचे सांगितले आहे. राज्य सरकारचा निर्णय योग्य आहे. यात शेतकर्‍यांचा तोटा होणार नसल्याने तो कदापी बदलणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे,” असे राजू शेट्टी म्हणाले.

Loan guarantee only to those who show vote power is Mahayuti condition for sugar factory leaders
‘मत’शक्ती दाखविणाऱ्यांनाच कर्जहमी; महायुतीची साखर कारखानदार नेत्यांसाठी अट?
eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
Conspiracy of sugar mills owners against me Raju Shettys allegation
माझ्या विरोधात साखर कारखानदारांचे षडयंत्र; राजू शेट्टी यांचा आरोप
In Raigad farmers will not be treated unfairly says Uday Samant
रायगडमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होणारा निर्णय घेणार नाही, उरणमधील महायुतीच्या सभेत पालकमंत्र्यांची ग्वाही

शेतकर्‍यांना विश्वासात न घेता साखर कारखानदारांच्या दबावापोटी हा निर्णय घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारच्या या निर्णयाविरूध्द मी याचिका दाखल केली आहे. एफआरपी एकरकमी वसूल केल्याशिवाय सोडणार नाही. रस्त्यावरील संघर्ष अटळ असून याचे गंभीर परिणाम आघाडी सरकारला भोगावे लागतील, असेही त्यांनी सांगितले.