महाविकास आघाडीला संपूर्ण महाराष्ट्रात १८ पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी राजकारणातून संन्यास घेणार, अशी घोषणा भाजपाचे आमदार आणि मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. आज लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर निकाल अगदी उलटे लागल्याचे दिसते. महायुती १८ ते १९ जागांवर मर्यादीत राहिली असून महाविकास आघाडीने २९ ते ३० जागांवर विजय मिळविला आहे. त्यामुळे शिवसेना उबाठा गटाकडून आता आशिष शेलार यांना डिवचण्यात येत आहे.

उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक्सवर ट्विट करत आशिष शेलार यांना टोला लगावला आहे. “आशिष शेलारजी संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय तेवढे सांगा ना… म्हणजे तुमच्या संन्यास सोहळ्याला मला तुम्हाला भगवी कफनी, रुद्राक्षाच्या माळा, काठी, लोटी, सगळं देता येईल”, अशी खोचक टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.

बीडमध्ये चुरशीची लढत; शेवटची फेरी बाकी; पंकजा मुंडे ४०० मतांनी आघाडीवर

आशिष शेलार हे वांद्रे पश्चिम विधानसभेचे आमदार आहेत. वांद्रे पश्चिम मतदारसंघ उत्तर मध्य लोकसभेत येत असल्यामुळे त्यांना इथून उमेदवारी देण्यात येत होती. मात्र त्यांनी लोकसभेसाठी नकार दिला. त्यानंतर इथून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र आता उज्ज्वल निकम यांचाही इथे धक्कादायक असा पराभव होऊन वर्षा गायकवाड विजयी झाल्या आहेत.

Lok Sabha Election 2024 : अजित पवार गटाच्या उमेदवाराला फक्त २०१ मतं, लाजिरवाणा पराभव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आशिष शेलार यांच्या प्रतिक्रियेची उत्सुकता

दरम्यान लोकसभेच्या निकालावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवर पोस्ट टाकून सदर निकाल स्वीकारत असल्याचे म्हटले.