भाजपा नेते आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते तसेच राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्यातली खडाजंगी थांबण्याचं नाव घेत नाहीये. भाजपाचे राज्यातले बहुतांश नेते सातत्याने संजय राऊत यांना लक्ष्य करत आहेत. तर राऊतदेखील त्यांना प्रत्युत्तर देत आहेत. अशातच आता भाजपा प्रदेश सचिव प्रमोद जठार यांनी राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. जठार म्हणाले की, “संजय राऊत हा त्या विक्रमाच्या मानगुटीवर बसलेला वेताळ आहे.”

जठार म्हणाले की, “उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ही जोडी विक्रम आणि वेताळासारखी आहे. उद्धव ठाकरे हे विक्रमादित्य होते. पण त्यांच्या मानगुटीवर संजय राऊत नावाचा वेताळ बसला आहे, त्याने गेल्या अडीच वर्षांमध्ये शिवसेनेला आणि ठाकरे मंडळींना लयास पोहोचवलं आहे. या वेताळाने शिवसेनेचं वाटोळं केलं. शिवसेनेचा धनुष्यबाण गेला, पक्ष गेला, सरकार गेलं, मुख्यमंत्रिपददेखील गेलं आणि आता हळूहळू शिवसैनिकही निघून जातील. सर्व शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्याकडे जातील.”

हे ही वाचा >> आदित्य ठाकरेंविरोधात मनसेचे संदीप देशपांडे वरळीतून लढणार? मनसेची मोर्चेबांधणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा वेताळ मातोश्रीचं वाटोळं करणार

जठार म्हणाले की, “शिवसेना लयाला जाऊ लागली आहे, या सगळ्याला जर कोणी कारणीभूत असेल तर तो संजय राऊत नावाचा वेताळ आहे. शिवसेनेची शंभर शकलं झाल्याशिवाय हा वेताळ काही शांत होणार नाही. हा या पक्षाला लयास पोहोचवणार आणि मातोश्रीचं वाटोळं करणार.”