कराड :  उद्धव ठाकरे कधी नव्हे एवढे महाराष्ट्रभर फिरत असलेतरी त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. लोक त्यांना, त्यांच्या विचारांना स्वीकारायला तयार नसल्याने  उद्धव ठाकरेंमध्ये कमालीचे नैराश्य असल्याची जोरदार टीका राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

संजय राऊतांसारखे विश्वज्ञानी

उद्धव ठाकरे यांच्या सभांना शिवसैनिक एकत्र होते, तेव्हांचा अन् आताचा मिळणारा प्रतिसाद यामध्ये खूपच फरक आहे. अशातच संजय राऊतांसारखे विश्वज्ञानी काही माणसं त्यांच्यासोबत आहेत. राऊत हे निवडून आलेल्या खासदारांवर टीका करतात. तत्पूर्वी त्यांनी एखाद्या जिल्हा परिषद मतदारसंघातून तरी निवडणूक येऊन दाखवावे असा टोला शंभूराजेंनी लगावला. 

. . त्यांना मतदानातूनच उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीयमंत्री अमित शहा यांच्या सभांना उदंड प्रतिसाद मिळत असताना, या नेत्यांचे दौरे म्हणजे औरंगजेबाच्या महाराष्ट्रावर स्वाऱ्या सुरू असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले असल्यावरून मंत्री देसाई म्हणाले, संजय राऊत यांना माध्यमांनी महत्व देण्याचे कारण नाही. पंतप्रधान मोदींनी देशाला उंचशिखरावर नेले आहे. हे देशातील जनतेने स्वीकारलेले आहे. ज्या नेतृत्वाला देशाने डोक्यावर घेतले आहे. आणि उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या सारखी माणसे दुसऱ्या बाजूला आहेत. त्यांना निवडणुकीच्या मतदानातूनच उत्तर मिळेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा >>> प्रकाश आंबेडकरांचे ते विधान हास्यास्पदच- पृथ्वीराज चव्हाण

‘महायुती’ला ४५ पेक्षा अधिक जागा

राज्यात पंचेचाळीसहून अधिकच्या जागा जिंकण्याचे ‘महायुती’चे उद्दिष्ट असून, ते नक्की पूर्ण झालेले दिसेल असा विश्वास शंभूराजेंनी दिला. वाईचे आमदार मकरंद पाटील हे नाराज नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.