अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेवरून अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. दुसरीकडे शरद पवारांनी पुन्हा पक्ष उभारणीसाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे. तर महाविकास आघाडीकडून एकनाथ शिदे अपात्र ठरणार असल्यामुळेच अजित पवारांच्या शपथविधीचा घाट घातला गेल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्या एका विधानामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

एकनाथ शिंदे १० ऑगस्टपूर्वी अपात्र ठरणार?

अजित पवारांचा शपथविधी एकनाथ शिंदेंना पर्याय म्हणून करून घेण्यात आला असून अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील, असा दावा ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. तसेच, येत्या १० ऑगस्टपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची अंमलबजावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना करावीच लागेल, त्यानुसार शिंदेंसह १६ आमदार अपात्र ठरतील, असा दावाही संजय राऊतांनी केला आहे.

“अजित पवारांनी तीन वेळा प्रयत्न केले”, संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, “मी ऑन कॅमेरा सांगतो की…!”

दरम्यान, एकीकडे काँग्रेसकडून महत्त्वाच्या नेत्यांनी महाविकास आघाडी एकसंघ राहणार असल्याचा दावा केला असताना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मात्र उद्धव ठाकरेंना ‘एकला चलो रे’चा सल्ला दिला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

“उद्धव ठाकरे आपली भूमिका येत्या दोन दिवसांत स्पष्ट करतीलच. पण एक मात्र नक्की. महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला, शिवसैनिकांना असं वाटतंय की आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वतंत्र चलो, अकेला चलो हा नारा द्यावा आणि पुढच्या राजकीय कामकाजात सहभागी व्हावं. ही सर्वसामान्य जनतेची भावना आहे”, असं विनायक राऊत चिपळूणमध्ये माध्यमांना म्हणाले आहेत.

“दोन दिवसांत अपेक्षित निर्णय होईल”, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचं सूचक ट्वीट; नेमकं काय घडणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“…आता अजित पवारांनीच उडी मारली!”

दरम्यान, प्रकाश आंबेडकरांच्या मुद्द्यावरून विनायक राऊतांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. “प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरेंच्या दोन वेळा बैठका झाल्या. पण वंचितला मविआमध्ये घेण्यासाठी सर्वात मोठा विरोध अजित पवारांचा होता. ‘प्रकाश आंबेडकर बेभरवशाचे आहेत. ते आयत्यावेळी तुम्हाला फसवतील’, असं अजित पवार वारंवार सांगायचे. आता प्रकाश आंबेडकर आहे तिथेच आहेत, पण अजित पवारांनी उडी मारली”, असा टोला राऊतांनी लगावला.