scorecardresearch

उमेश कोल्हे हत्या :आरोपींच्या घरांची ‘एनआयए’कडून झडती

बुधवारी ‘एनआयए’चे अधिकारी तसेच शहर कोतवाली, नागपुरी गेट पोलिसांच्या संयुक्त पाच पथकांनी आरोपींच्या घरांची झडती घेतली,

Nia file fir in umesh kolhe murder case stated that may have internation links
संग्रहित

अमरावती : उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील सातही आरोपींना सोमवारी रात्री ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए)ने या प्रकरणाचा तपास स्वतंत्ररीत्या सुरू केला आहे. बुधवारी ‘एनआयए’चे अधिकारी तसेच शहर कोतवाली, नागपुरी गेट पोलिसांच्या संयुक्त पाच पथकांनी आरोपींच्या घरांची झडती घेतली, शिवाय संपर्कातील व्यक्तींच्या घरांचीही झडती घेण्यात आली.

मुदस्सीर अहमद ऊर्फ सोनू रजा शेख इब्राहिम (२२), शाहरुख पठाण ऊर्फ बादशाह हिदायत खान (२५), अब्दुल तौफिक ऊर्फ नानू शेख तस्लिम (२४), शोएब खान ऊर्फ भुऱ्या साबीर खान (२२), अतिब रशीद आदिल रशीद (२२), युसूफ खान बहादूर खान (४४) तसेच सूत्रधार शेख इरफान शेख रहीम (३५) अशी ‘एनआयए’च्या ताब्यातील आरोपींची नावे आहेत.

एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याची चौकशी

उत्तर प्रदेशातील कानपूर येथे झालेल्या दंगलप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याला आज बुधवारी अमरावती पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले, चौकशीनंतर त्याची सुटका करण्यात आली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Umesh kolhe murder nia raids accused s houses zws