Vaishnavi Hagawane New Video : पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येप्रकरणामुळे अवघ्या राज्याचा काळजाचा ठोका चुकला. श्रीमंत, सुशिक्षित घरातील लेकीने हे पाऊल उचलल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय. तर दुसरीकडे आजही सुशिक्षित आणि प्रतिष्ठित घरांमध्येही हुंड्यासाठी सुनेचा छळ केला जातो हे पाहून पुरोगामी राज्याची किव आली. दरम्यान, वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह होता. त्यामुळे लग्नाच्या दिवशी ती प्रचंड खूश होती. अत्यंत सुंदर साजशृंगार करून तिने अनेक व्हिडिओही काढले. हेच व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओत तिने तिच्या सौभाग्याच्या लेण्याचा उल्लेख केलाय.

वैष्णवीच्या मेकअप आर्टिस्टने हा व्हिडिओ काढल्याचं प्रथमदर्शनी समर येतंय. तिला हा लूक आवडला का अशा प्रश्न तिल विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, खूप छान झालाय. एकदम ड्रिमी, टिपिकल महाराष्ट्रीय लूक झालाय. आजच्या लूकमध्ये मला माझे डोळे आवडले आहेत. डोळ्यांचा मेकअप अत्यंत सुंदर झालाय. आज मी एकदम खूश आहे.

मी आता अधिक सुंदर दिसतेय

लग्नाच्या विधींना सुरुवात होण्याआधी हा व्हिडिओ काढला असावा. तसंच, पोस्ट वेडिंग व्हिडिओही शेअर करण्यात आलाय. यामध्ये तिचा मेकअप जसाच्या तसा राहिला आहे. या पोस्ट वेडिंग व्हिडिओमध्ये तिच्या गळ्यात मंगळसुत्र, कपाळावर हळदीकुंकू आणि सिंदूर लावलंय. त्यामुळे ती म्हणतेय की, “मी अजून सुंदर झाली आहे. सौभाग्याचं लेणं मिळाल्याने मी अधिक सुंदर दिसतेय. खूप छान वाटतंय. मेकअपही थोडाही हलला नाही.”

वैष्णवी आणि शशांक हगवणे यांचं लग्न पुण्यात अत्यंत थाटामाटात पार पडलं होतं. या लग्नाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही हजेरी लावली होती. तेथील डामडौल पाहून अजित पवारांनी वैष्णवीच्या वडिलांना हे तुम्ही स्वतःच्या मर्जीने देताय की त्यांनी जबरदस्ती केली म्हणून देताय असा प्रश्नही विचारला होता. या लग्नातील फोटोही आता व्हायरल झालेत. तर वैष्णवीचा उखाणाही व्हायरल झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता उखाणा घे म्हटल्यावर ती म्हणते, “चंदेरी थाळी, सोनेरी बटण, शशांकरावांना आवडते चिकन आणि मटण” या उखाण्यानंतर ती गोड हसतेही आणि म्हणते की चिकन लव्हर. तिच्या या उखाण्यातून तिचं शशांकप्रती असलेलं प्रेमच स्पष्ट होतंय.