भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल त्या सध्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या जरी राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलं आहे. पंकजा मुंडे या भाजपामध्ये अस्वस्थ असून त्या लवकरच भाजपाला सोडचिठ्ठी देतील असं मिटकरींनी म्हटलं आहे. दरम्यान पंकजा मुंडे आता आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आल्या आहेत. परळीतील दांडिया महोत्सावत त्यांनी झिंगाट गाण्यावर अन्य महिलांच्या सोबत ठेका धरल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

परळी मध्ये आयोजित करण्यात आलेल्या दांडिया महोत्सवात पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली होती. यावेळी उपस्थिती महिलांनी त्यांना आपल्यासोबत झिंगाट गाण्यावर ठेका धरण्याचा आग्रह केला. तेव्हा पंकजा मुंडे या देखील महिलांसोबत नाचताना दिसून आल्या.
नवरात्र उत्सवानिमित्त पंकजा मुंडे सध्या परळीत दिसून येत आहेत. विविध ठिकाणी आयोजित केलेल्या दांडिया उत्सवास त्या भेटी देत आहेत. अशाचप्रकारे परळी शहरातील विद्यानगर भागातील सार्वजनिक दुर्गोत्सव समितीने आयोजित केलेल्या दांडिया महोत्सवात त्यांनी हजेरी लावली होती.

“पंकजा मुंडे भाजपाला सोडचिठ्ठी देतील, त्या राष्ट्रवादीत येत असतील तर…”; सुप्रिया सुळेंचा उल्लेख करत आमदाराचं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर, पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्या तर त्यांचं स्वागतच असल्याचं सूचक विधानही मिटकरींनी केलं आहे. विशेष म्हणजे पंकजा यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंचंही मत सकारात्मक असल्याचे संकेत मिटकरींनी दिले आहेत.