सांगली : स्वच्छतेसाठी देशपातळीवर प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर विटा नगरपालिकेने बाजारासाठी प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी पुढचे पाऊल उचलले असून आता पाच रूपयांमध्ये कापडी पिशवीचा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी नगरपालिकेने बाजारामध्ये ठिकठिकाणी पाच यंत्रेही बसवली आहेत.
हेही वाचा >>> ४८ कोटींची करचुकवेगिरी तेल व्यापाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल
प्लास्टिकची समस्या सध्या भीषण आहे मात्र प्लास्टिकला आपण ठोस पर्याय ही देऊ न शकल्याने प्लास्टिकचा सर्रास वापर सुरू आहे. त्यामुळे प्लस्टिक कचरा दिवसेंदिवस वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर विटा नगरपालिकेने पैसे जसे एटीएममधून काढता येतात तसे कापडी पिशव्याचे सध्या ५ वेंडिंग मशीन शहरात रहदारीच्या ठिकठिकाणी बसवलेत.
हेही वाचा >>> ‘कोल्हाट्याचं पोर’ लिहिणाऱ्या किशोर शांताबाई काळेंच्या आईचा संघर्ष संपेना! घर नाही, मानधनही मिळत नसल्याची खंत
प्लास्टिक पिशव्यांना पर्याय मिळाल्याशिवाय सध्या प्लास्टिकचा होणारा बेसुमार वापर थांबणार अशी परिस्थिती आहे. हा विचार करूनच रास्त दरात कापडी पिशव्या उपलब्ध आणि मिळवून देणारे वेंडिंग मशीन विटा शहरातील ठिकठिकाणी आणि बाजारपेठेत, भाजी मंडई मध्ये बसवण्यात आले आहेत. पाच रुपये टाकले की या यंत्रामधून चांगल्या पद्धतीची कापडी पिशवी मिळते यामुळे प्लास्टिक पिशव्यांचा होणारा वापर कमी होण्यास मदत होत आहे. या कापडी पिशव्या शिवण्याचे काम विटा मधीलच मन्नत महिला बचत गटाच्या महिला करतात. दररोज साधारण पाचशे पिशव्या शिवण्याचं आणि ते नगरपालिकेला पुरवण्याचे काम या महिला करत असतात. आय स्मार्ट टेकोनो सोल्युशनच्या माध्यमातून अशा पध्दतीने हे वेंडिंग मशीन उभारले आहेत.