Ladki Bahin Yojana :लाडकी बहीण या योजेनंतर्गत अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचे लक्षात येताच राज्य सरकारने पात्रता निकषांची आता अधिक काटेकोरपणे तपासणी सुरू केली आहे. दोन कोटी ६३ लाख लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या अर्जाची नियमित पडताळणी सुरू आहे, असे सरकारच्या वतीने सांगितले जात आहे. मात्र ही प्रक्रिया संथगतीने सुरू आहे ही बाब सरकार सातत्याने नाकारत आहे.

‘लाडकी बहीण’ योजनेसाठी लाभार्थींच्या अर्जाची पडताळणी

दोन लाख बहि‍णींच्या अर्जाची पडताळणी केल्यानंतर २२८९ लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी असल्याचे जाहीर करण्यात आले, ही पडताळणी जानेवारी फेब्रुवारीमध्ये झाली आहे. अडीच हजार सरकारी कर्मचारी असलेल्या लाडक्या बहि‍णींनी एकूण १३ हजार ५०० रूपयांचा लाभ घेतल्याचे उघड झाले. राज्य सरकारने आता थेट आयकर विभागाच्या मदतीने पडताळणी करण्याची तयारी दर्शवली आहे. आयकर विभागाकडून माहिती मागवली असली तरी अशी माहिती देण्याबाबत आयकर विभागाने केंद्राच्या वित्त मंत्रालयाकडे हा प्रस्ताव पाठविला असून, केंद्राच्या मान्यतेनंतरच ही सरकारला माहिती मिळू शकेल.

लाडकी बहीण योजना काय आहे? (What is the Ladki Bahin scheme?)

महाराष्ट्र सरकारने १८ जून २०२४ रोजी राज्याच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत, राज्य सरकार राज्यातील पात्र महिलांना आधार देण्यासाठी मासिक आर्थिक मदत देईल. ही योजना ‘माझी लाडकी बहीण योजना’ म्हणूनही ओळखली जाते. महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या वंचित महिलांना स्वावलंबी आणि सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. ही योजना महिलांना आर्थिक आधार देते. पात्र महिलांना या योजनेंतर्गत थेट त्यांच्या बँक खात्यात आर्थिक मदत मिळेल.

लाडकी बहीण योजनेचे फायदे (Ladki Bahin Yojana Benefits)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत, पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये मिळतील, जे दरवर्षी १८,००० रुपये होतात. संबंधितांना ही रक्कम थेट लाभ हस्तांतरा (DBT)द्वारे महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

लाडकी बहीण योजनेसाठीचे पात्रता निकष कोणते आहेत?

लाडकी बहीण योजनेची पात्रता (Ladki Bahin Yojana Eligibility)

अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
अर्जदार महिला असाव्यात.
अर्जदार विवाहित, घटस्फोटित, विधवा, परित्यक्त, निराधार किंवा कुटुंबातील एक अविवाहित महिला असू शकते.
महिलेचे २१ वर्षे ते ६५ वर्षांदरम्यान असावे.
अर्जदारांचे स्वत:चे बँक खाते आधार कार्डाशी जोडलेले असावे.
अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
अर्जदार आउटसोर्स केलेले कर्मचारी, कंत्राटी कामगार व २.५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेले स्वयंसेवी कामगार असू शकतात.

लाडकी बहीण योजनेतून कोण वगळले जाणार? (Ladki Bahin Yojana Exclusions)

खालीलपैकी कोणत्याही अटी लागू होणाऱ्या महिला या योजनेंतर्गत अपात्र असतील
ज्या महिलेचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
ज्या महिलेच्या कुटुंबातील सदस्यांचे उत्पन्न करपात्र आहे.
ज्या महिलेचे कुटुंबातील सदस्य सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत किंवा भारत सरकारमध्ये नियमित किंवा कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून काम करीत आहेत किंवा निवृत्तीनंतर पेन्शन घेत आहेत. पण, जर कुटुंबातील सदस्य आउटसोर्स केलेले कर्मचारी, कंत्राटी कामगार आणि स्वयंसेवी कामगार असतील, तर ती महिला या योजनेसाठी पात्र असेल.
ज्या महिलेला इतर सरकारी विभागांद्वारे राबविल्या जाणाऱ्या इतर कोणत्याही आर्थिक योजनेंतर्गत दरमहा रु. १,५०० किंवा त्याहून अधिक पैसे मिळतात.
ज्या महिलेच्या कुटुंबातील सदस्य सध्याचे किंवा माजी खासदार किंवा आमदार आहेत.
ज्या महिलेच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, मंडळ, संचालक, महामंडळ किंवा उपक्रमाचे सदस्य आहेत.
ज्या महिलेच्या कुटुंबातील सदस्यांकडे चारचाकी वाहन आहे (ट्रॅक्टर वगळता).

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लाडक्या बहि‍णींना १२ व्या हप्त्याची प्रतीक्षा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आतापर्यंत ११ महिन्यांचे १५०० रुपये मिळाले आहेत म्हणजे एकुण १६५०० रुपये मिळाले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या धोरणानुसार एका वर्षात लाडक्या बहिणींना किंवा लाभार्थ्यांना १८०० रुपये दिले जाणार आहेत. महाराष्ट्र सरकारनं गेल्या वर्षी म्हणजेच जुलै २०२४ पासून ही योजना सुरू केली होती. आता जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असून लाडक्या बहिणींना या महिन्याच्या १५०० रुपये केव्हा मिळतील याची प्रतीक्षा आहे.