scorecardresearch

Premium

“शाहाण्या लायकीत राहा, पैसे घेतल्याचं सिद्ध करून दाखव हरा*** नाहीतर…”; यशोमती ठाकूर नवनीत राणांवर संतापल्या

“नवनीत राणांना निवडून आणण्यासाठी दारोदार फिरलो. पण…”, असा टोलाही यशोमती ठाकूर यांनी लगावला

yashomati thakur navneet rana
यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणांना प्रत्युत्तर दिलं आहे. ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केला होता. लोकसभा निवडणुकीवेळी यशोमती ठाकूर यांनी रवी राणांकडून कडक नोटा घेतल्या, असा दावा नवनीत राणांनी केला होता. यावर यशोमती ठाकूर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राणांनी शहाणपण करत बोलायचं नाही. सिद्ध करून दाखव म्हणाव साxxx हराxxx… नाहीतर राजकारण सोडून देऊ, असं आव्हानही यशोमती ठाकूर यांनी राणांना दिलं.

नवनीत राणा काय म्हणाल्या?

“लोकसभा निवडणुकीवेळी माझ्याबरोबर फिरून यशोमती ठाकूर यांनी रवी राणांकडून कडक नोटा घेतल्या. रक्ताचे आश्रू ढाळण्याचं काम ठाकूर यांनी केलं होतं,” अशी टीका नवनीत राणांनी केली होती.

School Boy Kidnapped, pune, 50 Lakhs Ransom, Safely Rescued, police, Kidnappers, search,
पुणे : शाळकरी मुलाचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण, पोलिसांकडून सुखरूप सुटका; अपहरण करणाऱ्यांचा शोध सुरू
Farmers protest
शंभू सीमेवर धडकलेल्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीच्या वेशीवर तणाव
gautam gambhir arvind kejriwal PTI
“भाजपात जाण्यासाठी माझ्यावर दबाव”, केजरीवालांच्या वक्तव्यावर गौतम गंभीरचा टोला, म्हणाला…
One was stabbed to death by his friend for not paying for drinking
दारुसाठी पैसै न दिल्याने मित्राचा खून, नव्या आयुक्तांसमोर आव्हान

हेही वाचा : “शरद पवारांना इमानदारी सिद्ध करायला सांगणाऱ्यांची लायकी काय?” जितेंद्र आव्हाडांचं धनंजय मुंडेवर टीकास्र

“नवनीत राणा चोर निघाल्या”

यावर बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, “उगच अफवा पसरवायच्या नसतात. आम्ही तुम्हाला वहिनी म्हणून स्विकारलं होतं. निवडून आणण्यासाठी दारोदार फिरलो. पण, वहिणींचं प्रमाणपत्रच खोटं निघालं. त्या स्वत:हा चोर निघाल्या.”

हेही वाचा : “विखे-पाटलांबरोबर यशोमती ठाकूरही भाजपात प्रवेश करणार होत्या, पण…”, रवी राणांचा मोठा दावा

“राणांनी शहाणपणा करत बोलायचं नाही”

“शाहाण्या म्हणावं लायकीत राहा. माझ्या बापाने आणि कुटुंबाने इथे जमिनी देण्याचं काम केलं, घेण्याचं नाही. निवडणुकीत एखादी एकर शेती विकावी लागते, हे खरं आहे. नवनीत राणा आणि रवी राणा चोxxx. शहाणपणा करत बोलायचं नाही. सिद्ध करून दाखव म्हणाव साxxx हराxxx… नाहीतर राजकारण सोडून देऊ. उगाच फालतुगिरी सहन नाही करणार,” असा हल्लाबोल यशोमती ठाकूर यांनी राणांवर केला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Yashomati thakur reply navneet rana allegation get money ravi rana loksabha election ssa

First published on: 13-09-2023 at 00:00 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×