गणेशोत्‍सवासाठी रायगड जिल्‍ह्यातील आपल्‍या गावी येणाऱ्या चाकरमान्‍यांसाठी महत्‍वाची बातमी आहे. रायगड जिल्‍हा प्रशासनाने गणेशोत्‍सवास येणाऱ्यांठी निर्बंध घातले आहेत. मुंबई पुण्‍यासह जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या चाकरमान्‍यांना ७ ऑगस्‍टपूर्वी जिल्‍ह्यात दाखल व्‍हावे लागणार आहे . त्‍याचबरोबर त्‍यांना पुढचे १४ दिवस होम क्‍वारंटाइन रहावे लागणार आहे . रायगडच्‍या जिल्‍हाधिकारी निधी चौधरी यांनी खास गणेशोत्‍सवासाठी ज्‍या मार्गदर्शक सूचना जारी केल्‍या आहेत, त्‍यामध्‍ये याचा समावेश आहे .

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्‍य सरकारने गणेशोत्‍सवासाठी घालून दिलेल्‍या नियमांच्‍या अधीन राहून रायगडच्‍या जिल्‍हाधिकारी निधी चौधरी यांनी काल  रायगड जिल्‍हयासाठी परीपत्रक जारी केले आहे . त्‍यानुसार होम क्‍वारंटाइनबाबत सूचना करण्‍यात आल्‍या आहेत . होम क्‍वारंटाईन आदेशच्‍या अंमलबजावणीची जबाबदारी ही करोना प्रतिबंधक समिती व संरपंच यांची राहील.  रायगड जिल्‍ह्यात १५ हजारांच्‍या आसपास नागरिकांना करोनाची लागण झाली आहे . जिल्‍हयासह राज्‍यात करोनाच्‍या वाढत्‍या संसर्गाच्‍या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्‍यात आला आहे . याशिवाय यंदा गणेशोत्‍सव साधेपणाने साजरा करावा असं आवाहनदेखील करण्‍यात आलं आहे .

आणखी वाचा- यवतमाळसह सहा शहरांमध्ये टाळेबंदीत वाढ

याखेरीज गणेशमूर्तींच्‍या उंचीवरदेखील निर्बंध घालण्‍यात आले आहेत . घरगुती गणेशमूर्ती ही दोन फुटांची तर सार्वजनिक गणेशोत्‍सवासाठी चार फुटांपर्यंत उंचीची मूर्ती ठेवता येणार आहे.  गणेशोत्‍सवासाठी कुणी स्‍वेच्‍छेने वर्गणी किंवा देणगी दिल्‍यास स्‍वीकारता येईल, मात्र घरोघरी जावून वर्गणी मागता येणार नाही . भपकेबाज जाहीराती‍ किंवा पोस्‍टरबाजी करू नये, अशाही सूचना देण्‍यात आल्‍या आहेत . गणेश मंडपात निर्जतुकीकरणाबरोबरच, तापमान तपासणी व्‍यवस्‍था असावी तसेच दिवसातून किमान तीन वेळा मंडपाचे निर्जंतुकीकरण करावे, अशा सूचना देण्‍यात आल्‍या आहेत .

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You will come to konkan for ganeshotsav stay in 14 days of home quarantine msr
First published on: 01-08-2020 at 08:37 IST