कलाविश्वात समर्पक वृत्तीने काम करणाऱ्या प्रत्येक कलाकारासाठी पुरस्कारांच्या रूपाने मिळालेली पसंतीची पोचपावती खूप महत्त्वाची असते. त्यामुळे इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी अर्थात आयफा पुरस्कार सोहळा म्हणजे कलाकारांसाठी एक प्रकारची पर्वणीच असते. हा सोहळा गेल्या काही वर्षांपासून निरनिराळ्या देशांमध्ये साजरा करण्यात येत आहे. मात्र यंदाचा हा पुरस्कार सोहळा मुंबईमध्ये पार पडला. यंदा या सोहळ्याचं हे २० वर्ष होतं. बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांच्या मांदियाळीमध्ये संपन्न झालेल्या या सोहळ्यामध्ये अनेक कलाकारांना IIFA Awards 2019 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
आणखी वाचा : ‘या नवरा बायकोला समजवा काहीतरी’; दीपवीरच्या कपड्यांवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
‘राजी’ या चित्रपटातून दमदार भूमिका करत कलाविश्वामध्ये स्वत:ला सिद्ध करणाऱ्या अभिनेत्री आलिया भटला यंदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तर अभिनेता रणवीर सिंगला ‘पद्मावत’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. विशेष म्हणजे यावेळी ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदवीर जगदीप जाफरी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
सर्वोत्कृष्ट चित्रपट- राजी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आलिया भट्ट (राझी)
सर्वोत्कष्ट अभिनेता- रणवीर सिंग (पद्मावत)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- श्रीराम राघवन (अंधाधुन)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- अदिती राव हैदरी (पद्मावत)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- विकी कौशल (संजू)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री – सारा अली खाल (केदारनाथ)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता- इशान खट्टर
(आयफा पुरस्काराच्या) २०व्या वर्षातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- दीपिका पदुकोण</p>
(आयफा पुरस्काराच्या) २०व्या वर्षातील सर्वोत्कृष्ट अभिनेता- रणबीर कपूर</p>
गेल्या २० वर्षांमधील सर्वोत्कृष्ट संगीत- प्रितम
गेल्या २० वर्षांतील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- राजकुमार हिरानी (संजू)
सर्वोत्कृष्ट संगीत- ‘सोनू के टिटू की स्वीटी’
सर्वोत्कृष्ट कथा- ‘अंधाधुन’
जीवनगौरव पुरस्कार – ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदवीर जगदीप जाफरी
सर्वोत्कृष्ट गीतकार – अमिताभ भट्टाचार्य (धडक)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अरिजित सिंग (ए वतन- राझी)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- हर्षदीप कौर (दीलबरो- राझी)