News Flash

‘महाभारत’साठी आमिरला मिळणार का प्रभासची साथ?

ऐतिहासिक कथानक असलेल्या चित्रपटांचा सध्या जोरदार ट्रेण्ड आहे. याचाच विचार करत बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान ‘महाभारत’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे.

आमिर खान, प्रभास

ऐतिहासिक कथानक असलेल्या चित्रपटांचा सध्या जोरदार ट्रेण्ड आहे. याचाच विचार करत बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान ‘महाभारत’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना ‘लार्जन दॅन लाइफ’ अनुभव देण्याचा आमिरचा प्रयत्न आहे आणि या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टसाठी तो सध्या दिवसरात्र मेहनत घेत आहे. मोठमोठे सेट्स, बडे कलाकार आणि भारावून टाकणारी दृश्यं ही या चित्रपटाची वैशिष्ट्ये ठरणार आहेत. यासाठी आमिरने ‘बाहुबली’ फेम प्रभासला विचारल्याची माहिती समोर येत आहे.

‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार या ऐतिहासिक कथानकाच्या चित्रपटात आमिरने प्रभासला अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका साकारण्याची ऑफर दिली आहे. ‘बाहुबली’ या चित्रपट पाहिल्यानंतर आमिरने एकदातरी प्रभाससोबत काम करण्याचा निश्चय केला होता. ‘महाभारत’साठी प्रभास परफेक्ट असल्याने आमिरने त्याला विचारणा केली आहे.

वाचा : ‘लाइफ इन अ मेट्रो’च्या सिक्वलमध्ये अभिषेक- इलियाना?

बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्टची ही इच्छा आता प्रभास पूर्ण करणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. त्याचसोबत प्रभासचं हे बॉलिवूड पदार्पण ठरेल. सध्या प्रभास ‘साहो’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. यामध्ये त्याच्यासोबत श्रद्धा कपूर स्क्रिन शेअर करणार आहे.
‘महाभारत’ हा चित्रपट सीरिजमध्ये प्रदर्शित होणार असून त्याचे तीन ते चार भाग असल्याचे म्हटले जात आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक भागासाठी दिग्दर्शकसुद्धा वेगवेगळे असतील. ‘महाभारत’ची निर्मिती करणे हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे, असे आमिरने याआधी एका मुलाखतीत सांगितले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 4:16 pm

Web Title: aamir khan approaches prabhas for his next project mahabharat
Next Stories
1 ‘लाइफ इन अ मेट्रो’च्या सिक्वलमध्ये अभिषेक- इलियाना?
2 Video : अडचणींमध्येही प्रेम खुलवणारं ‘सुई धागा’ मधलं पहिलं गाणं प्रदर्शित
3 हृतिकच्या फ्लर्टला वैतागून दिशाने सोडला चित्रपट?
Just Now!
X