News Flash

फक्त शाहरुखसाठी आमिरने केलं ‘हे’ काम

दिल्लीत झाली दोघांची भेट

बॉलिवूडच्या ‘खान’दानपैकी मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खान सध्या त्याच्या आगामी ‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. आमिरच्या या चित्रपटात शाहरुख खान पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे. त्याच्या शूटिंगसाठी किंग खान दिल्लीला रवाना झाला होता. ‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपटातील केवळ शाहरुखच्या भागाचं दिग्दर्शन आमिरने स्वत: केलंय. यावेळी सेटवर दोघांनी मजामस्ती करत शूटिंग पार पाडलं. इतकंच नव्हे तर शूटिंग संपल्यानंतर दोघांनी एकमेकांसोबत वेळ घालवला.

आमिरच्या ‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटाच्या व्हिज्युअल इफेक्ट्सची जबाबदारी शाहरुखची कंपनी सांभाळत आहे. ‘फॉरेस्ट गम्प’ या इंग्रजी चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. यामध्ये आमिरसोबत अभिनेत्री करीना कपूर खान मुख्य भूमिका साकारतेय. करीनाने नुकतीच तिची शूटिंग संपवली असून चित्रपटाचं दिग्दर्शन अद्वैत चंदन करत आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंत चित्रपटाचं शूटिंग पूर्ण होणार असून नवीन वर्षात आमिरचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजतंय.

आणखी वाचा : अखेर भूषणने व्यक्त केल्या भाग्यश्रीबद्दलच्या प्रेमभावना?

दुसरीकडे शाहरुखने २०१८ मध्ये ‘झिरो’नंतर कोणत्याच चित्रपटात काम केलं नाही. इतके दिवस त्याने कोणत्याही चित्रपटाची घोषणासुद्धा केली नव्हती. त्यामुळे चाहत्यांकडून त्याला वारंवार नवीन चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर प्रश्न विचारले जात होते. अखेर शाहरुख आगामी ‘पठाण’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये दीपिका पदुकोण त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. शाहरुख आणि दीपिकाने याआधी ‘ओम शांती ओम’ आणि ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2020 11:40 am

Web Title: aamir khan directs shah rukh khan cameo in laal singh chaddha ssv 92
Next Stories
1 धमक्यांप्रकरणी अलका कुबल यांनी घेतली उदयनराजे भोसलेंची भेट
2 अलका कुबल यांनी घेतली उदयनराजे यांची भेट; प्राजक्ता गायकवाडशीही केली चर्चा
3 Video : ओम फट स्वाहा, ‘झपाटलेला’ पाहताना चिमुकल्या जिजाचा व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X