News Flash

Video: छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी अभिनेता भूषण प्रधानने ‘असा’ केला अभ्यास

जय शिवाजी, जय भवानी' मालिकेत अभिनेता भूषण प्रधान छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार आहे.

(Photo-instagram@bhushan_pradhan)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नपूर्ततेसाठी हजारो शिलेदारांनी जीव ओवाळून टाकला. याच शिलेदारांच्या शौर्याची गोष्ट सांगणारी जय भवानी जय शिवाजी’ ही मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या मालिकेच्या प्रोमोजना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे.

जय शिवाजी, जय भवानी’ मालिकेत अभिनेता भूषण प्रधान छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार आहे. या भूमिकेसाठी भूषणने मोठी मेहनत घेतली आहे. लोकसत्ता डिजिटल अड्डावर भूषणने मनसोक्त गप्पा मारत त्याच्या भूमिकेविषयी सांगितलं आहे.

भूषण प्रधानने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी प्रचंड अभ्यासदेखील केला. यासाठी त्याने वाचन केलं तसंच इंडस्ट्रीमधील काही मित्रांशी गप्पा मारत त्यांचा सल्लाही घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2021 5:47 pm

Web Title: actor bhushan pradhan playing chatrapti shivaji maharaj in jai bhawani jai shivaji new marathi serial kpw 89
Next Stories
1 मृत्यूपूर्वी मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांनी केले होते ‘हे’ प्लॅनिंग
2 “वेल डन बॉईज”; मुलांचे भावविश्व मांडणारा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
3 Bharti Singh Birthday : गर्भातच मारणार होती आई, तर नातेवाईकांनी टाकलं होतं वाळीत…
Just Now!
X