News Flash

अभिनेता सुरज थापर ICUमध्ये दाखल

त्याच्या बहिणीने याबाबत माहिती दिली आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘शौर्य और अनोखी’मध्ये काम करणारा अभिनेता सूरज थापरला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. सूरजची बहिण वनीताने या संदर्भात माहिती दिली आहे. सूरज गोव्याला मालिकेचे शूट करत होता. गेल्या तीन दिवसांपासून सूरजला ताप आला होता. त्यामुळे चित्रीकरण संपवून तो मुंबईला परत येताच त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

सूरजची बहिण वनीताने ‘नवभारत टाइम्स’शी संवाद साधला. तेव्ही तिने, गोव्याहून मुंबईला आल्यावर एअरपोर्टवर सूरजच्या दोन चाचण्या करण्यात आल्या. त्याच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी आणि पल्स रेट चेक करण्यात आले. तसेच सूरजने करोना चाचणी देखील करुन घेतली. पण करोना चाचणीचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही. मुंबईत आल्यावर ताप आला आणि ऑक्सिजन लेव्हल कमी झाली. त्यामुळे त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे अशी माहिती दिली.

आणखी वाचा : IPL स्थगित झाल्यानंतर करोना रुग्णांसाठी ‘विरुष्का’चा पुढाकार; निधी गोळा करण्यासाठी पोस्ट केला व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Sooraj Thapar (@soorajthapar)

पुढे तिने सांगितले की गोव्यात मालिकेचे चित्रीकरण सुरु असताना सूरज हा हॉटेलमध्येच थांबत असते. सेटवर शूटिंगदरम्यान गप्पा मारण्यासही परवानगी नव्हती. माझा भाऊ लवकर बरा होण्यासाठी कृपया सर्वांनी प्रार्थना करा.

सूरजने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्याच्या ‘ससुराल गेंदा फूल’, ‘एक नई पहचान’ आणि ‘छल-शह और मात’ या मालिका लोकप्रिय ठरल्या होत्या. आता तो ‘शौर्य और अनोखी’ या मालिकेत काम करताना दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2021 4:12 pm

Web Title: actor sooraj thapar admitted in icu after returning from goa avb 95
Next Stories
1 …अशी सुरु झाली सोनम कपूर आणि आनंदची प्रेमकहाणी
2 ‘क्रिश’मध्ये हृतिकसोबत प्रियांका ऐवजी दिसणार होती ‘ही’ अभिनेत्री
3 “माझा मुलगा कुठे आहे?”; ‘खतरो के खिलाडी’साठी अफ्रिकेला गेलेल्या श्वेता तिवारीला अभिनवचा सवाल
Just Now!
X