बॉलिवूडमध्ये आजच्या घडीला अनेक अभिनेत्री लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. मात्र या अभिनेत्रींच्या गर्दीत अजूनही ९० च्या दशकातील काही अभिनेत्री त्यांचं स्थान भक्कम ठेवून आहेत. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे सोनाली बेंद्रे. ९० च्या काळात आपल्या आरस्पानी सौंदर्य आणि मनमोहक हास्य यांच्या जोरावर सोनालीने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवला. त्यामुळे आजही ही अभिनेत्री अनेकांचं क्रश असल्याचं पाहायला मिळतं. अलिकडेच सोनालीने तिचा एक थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. विशेष म्हणजे हा फोटो सध्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून प्रत्येक जण लॉकडाउन असल्यामुळे घरात आहे. या काळात अनेकांनी त्यांचे थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत. यात सेलिब्रिटींचाही समावेश आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अनेक कलाकारांनी त्यांचे थ्रोबॅक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात सोनाली बेंद्रेनेदेखील तिचा जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोत सोनाली बिकिनीमध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे हा फोटो चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

 

morarji desai drink urine
माजी पंतप्रधान मोरारजी देसाई खरंच ‘शिवांबू’ प्राशन करायचे? जाणून घ्या
Sita & Akbar: How names of two lions became the reason for a plea in Calcutta High Court
अकबराची बहीण लक्ष्मी? अकबर, सीता, तेंडुलकर आदी नावं प्राण्यांना द्यायची पद्धत कशी पडली?
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
View this post on Instagram

 

If only this wasn’t a throwback… miss the sun, sea, sand…. and of course those abs and the flowing hair! #ThrowbackThursday

A post shared by Sonali Bendre (@iamsonalibendre) on

या फोटोमध्ये सोनालीने बिकिनी परिधान केली असून ती समुद्र किनाऱ्यावर धावताना दिसत आहे. “जर हा फक्त थ्रोबॅक फोटो नसता तर..सूर्य, समुद्र, वाळू आणि खरंच ते अॅब्स आणि लांबसडक केसांची आठवण येते”, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.

दरम्यान, सोनालीने तिच्या कारकिर्दीमध्ये अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यात ‘सरफरोश’, ‘दिलजले’ आणि ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाची विशेष प्रशंसा करण्यात आली होती. मध्यंतरी सोनालीला कर्करोगासारख्या असाध्य रोगाचा सामना करावा लागला होता. मात्र यावर तिने यशस्वीरित्या मात केली.