News Flash

राजकीय पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चांवर अक्षय कुमारचा खुलासा, म्हणाला…

जाणून घ्या सविस्तर

गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत मिथून चक्रवर्ती यांनी राजकीज पक्षात पदार्पण केले. आता बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार रविवारी कोलकातामध्ये राजकील रॅलीचा भाग होणार अशी चर्चा सुरू होती. यावर अक्षयने आता वक्तव्य केलं आहे.

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, “कोलकातामधील राजकीय रॅलीत माझ्या उपस्थितीबद्दल अफवा पसरवल्या गेल्या याबद्दल मला आश्चर्य वाटते. मी सध्या मुंबईत शुटिंगमध्ये व्यस्त आहे, आणि कोलकाता येथील राजकीय रॅलीतील माझी उपस्थिती असेल ही बातमी अफवा आणि खोटी आहे,” असे अक्षय कुमार म्हणाला.

अक्षयने ‘राम सेतु’ या त्याच्या आगामी चित्रपटाला सुरूवात केली आहे. अक्षयने स्क्रिप्ट रीडिंगचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ज टीम एकत्र काम करते ती टीम नेहमीच उत्तम काम करते! चित्रपटाच्या चित्रीकरणाची प्रतिक्षा करू शकतं नाही. अशा आशयाचे कॅप्शन अक्षयने त्या फोटोला दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

याशिवाय अक्षय कुमार ‘सुर्यंवशी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित होणार होता पण करोनाव्हायरस परिस्थिती आणि चित्रपटगृहे बंद पडल्यामुळे हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहे. यानंतर अक्षय अभिनेता धनुष आणि अभिनेत्री सारा अली खानसोबत ‘अतरंगी रे’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. तर अक्षय कुमारने ‘रक्षाबंधन’ या चित्रपटाची घोषणा देखील केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2021 4:01 pm

Web Title: after mithun chakraborty akshay kumar is joining the political party dcp 98
Next Stories
1 ‘मी टेलिव्हिजन विश्वातून ब्रेक घेतोय’, अभिनेत्याचा खुलासा
2 ‘पोरगं मजेतय’ प्रदर्शनासाठी सज्ज
3 लग्नासाठी स्वरा भास्कर तयार, फोटो शेअर करत म्हणाली…
Just Now!
X