अभिनेता अजय देवगण सध्या कामात चांगलाचं व्यस्त आहे. एकीकडे संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठीयावाडी’ या सिनेमाचा प्रोजेक्ट हातात आहे. तर दुसरीकडे ‘मेडे’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये तो व्यस्त आहे. अजय देवगण या सिनेमाचं दिग्दर्शन करत असून हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

अजय देवगण दिग्दर्शित ‘मेडे’ या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रकुल प्रित यांची मुख्य भूमिका आहे. याशिवाय अजय देवगणदेखील या सिनेमात एका भूमिकेत झळकणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी म्हणजेच 22 एप्रिल 2022 ला प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार हा सिनेमा 2015 सालात घडलेल्या दोहा कोची विमान दुर्घटनेवर आधारित आहे. या सिनेमात अजय देवगण एका वैमानिकाच्या भूमिकेत झळकणार आहे.

loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: आम्हीही तेव्हाच ‘व्हेटो’विरोधात होतो..
vijay kelkar
अग्रलेख: कराग्रे वसते लक्ष्मी..
shree ram mandir
१२वीच्या पुस्तकातून बाबरी पतनाचा उल्लेख गायब…
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

काय होती दोहा-कोची घटना?

18 ऑगस्ट 2015 सालात ही घटना घडली होती. दोहा विमानतळावरून उड्डाण घेतलेल्या विमानाला कोची विमानतळावर उतरताना काही अडचणींचा सामना करावा लागला होता. या विमानात 141 प्रवासी तर 8 विमान कर्मचारी होते. मात्र खराब हवामानामुळे वैमानिकाला धावपट्टी दिसणं कठीण झालं त्यांमुळे विमानाचं लॅन्डिग रद्द करण्यात आलं. त्यानंतर विमान त्रिवेंद्रम विमानतळावर पोहचलं. मात्र इथेही धुकं आणि खराब वातावरण असल्याने लॅन्डिग करण वैमानिकाला शक्य झालं नाही.

अखेर तीन प्रयत्नांनंतर चौथ्यांदा विमान धावपट्टीवर उतरवण्यास वैमानिकाला यश आलं. मात्र दरम्यानच्या काळात विमानात अत्यंत कमी म्हणजेच केवळ 350 किलो इंधन शिल्लक होतं. नियमानुसार बोइंग 737 विमानात कमीत कमी 1500 किलो इंधन असणं गरजेचं असतं. एकीकडे कमी इंधन साठा आणि दुसरीकडे स्पष्ट न दिसणारी धावपट्टी यात प्रवाशांचा जीव वाचवणं ,असा मोठा प्रश्न वैमानिकासमोर उभा ठाकला होता. हा संपूर्ण थरार या सिनेमात अनुभवता येणार आहे.

या सिनेमाचं शूटिंग 2020 मध्य़ेच सुरु करण्यात आलं होतं. सिनेमाचं बरंच शूटिंग पूर्ण झालं आहे. या सिनेमाचं उर्वरित शूटिंग लवकरच पूर्ण करण्यात येणार होतं. मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा हे शूटिंग पुढे ढकलण्यात आलं आहे.