News Flash

अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ने सलमान, अक्षय, रणवीर सिंगच्या चित्रपटांना टाकलं मागे

रचला नवीन विक्रम

नरवीर तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा सांगणाऱ्या ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवीन विक्रम रचले. इतर चित्रपटांची टक्कर असतानाही ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट चौथ्या आठवड्यातही चांगली कमाई करत आहे. २०१९-२०२० मध्ये जगभरात दणक्यात कमाई करणाऱ्या टॉप पाच बॉलिवूड चित्रपटांमध्ये ‘तान्हाजी’ने स्थान मिळवलंय.

‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाने आतापर्यंत (२६ दिवसांत) जगभरात ३२४ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर भारतात या चित्रपटाची कमाई २९५ कोटी रुपये इतकी झाली आहे. या कमाईच्या बाबतीत अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ने सलमान खान, अक्षय कुमार आणि रणवीर सिंगच्या चित्रपटांनाही मागे टाकलंय.

चित्रपटांची जगभरातील कमाई-

१. वॉर- ४४२.४१ कोटी रुपये
२. कबीर सिंग- ३७२.४९ कोटी रुपये
३. उरी: द सर्जिकल स्ट्राइक- ३३८.३९ कोटी रुपये
४. तान्हाजी: द अनसंग वॉरिअर- ३२४ कोटी रुपये (२६ दिवसांत)
५. भारत- ३०८.७० कोटी रुपये
६. गुड न्यूज- ३०४.१२ कोटी रुपये (३५ दिवसांत)
७. हाऊसफुल ४- २९५.८० कोटी रुपये
८. मिशन मंगल- २७९.६८ कोटी रुपये
९. गली बॉय- २३०.५३ कोटी रुपये
१०. दबंग ३- २१७.८४ कोटी रुपये
११. सुपर ३०- २०५.३४ कोटी रुपये
१२. छिछोरे- २०३.६३ कोटी रुपये
१३. केसरी- २०१.३० कोटी रुपये
१४. ड्रीम गर्ल- १९५.४३ कोटी रुपये
१५. साहो (हिंदी)- १९२.६२ कोटी रुपये

‘तान्हाजी’ या चित्रपटाची सध्याची कमाई पाहता येत्या काही दिवसांत हा ‘उरी’ या चित्रपटालाही मागे टाकत ३४० ते ३४५ कोटी रुपयांच्या घरात पोहोचेल असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषकांनी वर्तवला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2020 4:14 pm

Web Title: ajay devgn tanhaji beats salman khan akshay kumar and ranveer singh films ssv 92
Next Stories
1 ‘स्वराज्यरक्षक संभाजी’संदर्भातील त्या अफवांवर विश्वास ठेऊ नका’; अमोल कोल्हेंचे आवाहन
2 “शौचास कुठे बसावं हे न कळणारे करतायत CAA ला विरोध”
3 कौतुकास्पद: अभिनेत्याने विवाहानंतर भेट दिली राज्यघटनेची प्रत
Just Now!
X