25 November 2020

News Flash

पुढच्या वर्षी सुरु होणार अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ चित्रपटाचे चित्रीकरण

चित्रपट व्यापार विश्लेषक करण आदर्श यांनी माहिती दिली आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर त्याचा ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट ट्रेंड होत आहे. हा एक अॅक्शन आणि कॉमेडीचा भरणा असलेला चित्रपट आहे. आता लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाचे चित्रीकरण पुढच्या वर्षी सुरु होणार असल्याचे म्हटले आहे. ‘अक्षय कुमार आणि क्रिती सेनॉन यांचा अॅक्शन कॉमेडी चित्रपटाचे चित्रीकरण जानेवारी २०२१मध्ये सुरु होणार आहे. मार्च २०२१पर्यंत चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे. चित्रपटात आणखी एक अभिनेत्री दिसणार आहे’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

‘बच्चन पांडे’ हा चित्रपट फरहाद सामजी दिग्दर्शित करणार असून साजिद नाडियाडवाला चित्रपटाची निर्मिती करणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील अक्षयचा लूक समोर आला होता. आता या चित्रपटात अक्षयसोबत क्रिती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 4:40 pm

Web Title: akshay kumar to start shooting for bachchan pandey in january next year avb 95
Next Stories
1 ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्रींच्या अडचणीत वाढ; उच्च न्यायालयाने जामीन याचिका फेटाळली
2 सलमानची ही हिरोईन होती प्रभासची क्रश, ‘या’ चित्रपटात साकारणार आईची भूमिका
3 Video : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेविषयी ‘त्या’ वक्तव्याबद्दल अलका कुबल यांनी मागितली माफी
Just Now!
X