‘बाहुबली’ या लोकप्रिय चित्रपटामधील भल्लालदेव अर्थात अभिनेता राणा डग्गुबती विवाहबंधनात अडकला आहे. ८ ऑगस्ट रोजी, शनिवारी संध्याकाळी राणा व मिहीका बजाज यांचा विवाहसोळा पार पडला. या निमित्ताने चाहत्यांनी राणा व मिहीकावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेता अक्षय कुमारने देखील आपल्या अनोख्या अंदाजात राणाला शुभेच्छा दिल्या.
Perfect way to get permanently locked-down 🙂 Congratulations @RanaDaggubati , wishing you both a lifetime of happiness https://t.co/asr7d0Vrf2
— Akshay Kumar (@akshaykumar) August 8, 2020
अवश्य पाहा – ‘जनता तुला माफ करणार नाही’; रियाला पाठिंबा देणाऱ्या आयुषमानवर संतापला अभिनेता
“आयुष्यभरासाठी लॉकडाउनमध्ये जाण्याची ही योग्य पद्धत आहे. राणा तुला लग्नाच्या भरपूर शुभेच्छा. जगातील सर्व आनंद तुम्हाला मिळो.” अशा आशयाचं ट्विट करुन अक्षयने शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षय व्यतिरिक्त बिपाशा बसु, काजल अग्रवाल, श्रुति हसन, अमाला पॉल, श्रिया शरण, राम चरण अशा अनेक सेलिब्रटींनी राणावर शुभेच्छांचा वर्षाव केला. सेलिब्रिटींच्या या पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
Finally my hulk is marriedwishing @ranadaggubati #miheeka a very happy life together!! pic.twitter.com/RJEw5CZq0L
— Ram Charan (@AlwaysRamCharan) August 8, 2020
अवश्य पाहा – WWE मध्ये नोकर कपात; या सुपरस्टार्सला दाखवला बाहेरचा रस्ता
हा लग्नसोहळा हैदराबादमधल्या रामानायडू स्टुडिओत पार पडला. करोनाच्या पार्श्वभूमीवर या विवाहसोहळ्याला मोजकेच लोक उपस्थित राहिले होते. शिवाय सुरक्षेसाठी योग्य ती काळजी देखील घेण्यात आली होती. मिहीका इंटिरिअर डिझायनर असून एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची मालकीण आहे. मिहीकाचे वडिल हैदराबादमधील नामांकित सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी आहेत. तर आई ज्वेलरी डिझायनर आहे.