छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी अभिनेत्री अलका कुबल यांनी जाहीर माफी मागितली आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी माफी मागितली आहे. एका मुलाखतीत अलका कुबल यांनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेविषयी बोलताना छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता.
“आमच्या मालिकेचा जो वाद सुरू होता, त्याबद्दल मी बोलताना छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. अनवधानाने माझ्या तोंडून एकेरी उल्लेख निघाला याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते”, असं त्या या व्हिडीओत म्हणाल्या.
View this post on Instagram
आणखी वाचा : “तिला लाजच नाही”; प्राजक्ता गायकवाडवर भडकल्या अलका कुबल
अलका कुबल निर्मात्या असलेली ‘आई माझी काळूबाई’ ही मालिका सध्या फार चर्चेत आहे. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडला या मालिकेतून काढून टाकल्याचं सांगत अलका कुबल यांनी तिच्यावर काही आरोप केले आहेत. या आरोपांविषयी मुलाखतीत बोलताना त्यांच्या तोंडून छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झाला. त्यावरून सोशल मीडियावर अनेकांनी टीकादेखील केली होती.