बॉलिवूडचा किंग शाहरुख सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘डिअर जिंदगी’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. उद्या हा सिनेमा संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. गौरी शिंदे हिच्या दिग्दर्शनात बनलेल्या या सिनेमाकडून अनेकांना चांगल्याच अपेक्षा आहेत. सिनेमाच्या नेहमीच्या धाटणीपेक्षा या सिनेमाची संहिता वेगळी आहे. या सिनेमाची निर्मिती गौरी खान, करण जोहर आणि गौरी शिंदे यांनी रेड चिलीज्, धर्मा प्रोडक्शन आणि होप प्रोजक्शन या बॅनर अंतर्गत केले आहे.

या सिनेमाला अमित त्रिवेदी याने संगीत दिले असून, कौसर मुनिर याने ही गाणी लिहीली आहेत. आतापर्यंत या सिनेमातली सगळीच गाणी प्रेक्षकांना पसंत पडली आहेत.

‘डिअर जिंदगी’ याआधी शाहरुखचा ‘फॅन’ हा सिनेमाही आला होता. शाहरुखला या सिनेमाकडून फार अपेक्षा होत्या. पण प्रेक्षकांना मात्र हा सिनेमा तितकासा आवडला नाही. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई हा सिनेमा करु शकला नाही. यानंतर शाहरुखने दिग्दर्शक करण जोहरचा बहुचर्चित सिनेमा ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. बादशहाची ही छोटेखानी भूमिका त्याच्या चाहत्यांना फार आवडली.

‘डिअर जिंदगी’बद्दल थोडक्यातः

डिअर जिंदगी कधी प्रदर्शित होणार?

भारतात विविध चित्रपटगृहांमध्ये हा सिनेमा उद्या २५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. तर इतर देशात २३ नोव्हेंबरला या सिनेमाचे प्रदर्शन झाले. अमेरिकेत हा सिनेमा सगळ्यात आधी प्रदर्शित करण्यात आला. अमेरिकेतल्या समिक्षकांनी या सिनेमाची प्रशंसा केली.

नक्की सिनेमा कशावर भाष्य करतो?

गौरी शिंदे हिच्या दिग्दर्शनात बनलेला ‘डिअर जिंदगी’ हा सिनेमा आयुष्यातल्या चढ- उतारावर भाष्य करतो. या सिनेमात शाहरुख, आलियाचा गुरु दाखवण्यात आला आहे. ‘डिअर जिंदगी’मध्ये शाहरुख जहांगीर आणि आलिया कायरा या व्यक्तिरेखा साकारत आहेत. प्रत्येकाला या सिनेमातून स्वतःसाठी काही तरी बोध घेता येईल असेच या सिनेमाच्या टिझरवरुन तरी वाटते आहे.

नक्की या सिनेमात आहेत तरी कोण?

डिअर जिंदगीमध्ये शाहरुख खान, आलिया भट्ट, अंगद बेदी, कुणाल कपूर, अली जफर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

सिनेमातील प्रेक्षकांच्या पसंतीचे संवाद

“मेरे डॅड मुझे हर सण्डे यहा लाया करते थै, समुंदर से कबड्डी खेलने” – शाहरुख
“मैं आझाद होना चाहती हूँ.. इन सब से” – आलिया भट्ट
“मैं भी चाहता हूँ तुम आझाद हो जाओ” – शाहरुख

या सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन अंदाजे किती होईल?

दिवाळीमध्ये प्रदर्शित झालेले शिवाय आणि ऐ दिल है मुश्किल या सिनेमांची पहिल्या दिवसांची कमाई ही निराशाजनकच होती. पण गौरी शिंदे हिच्या दिग्दर्शनात बनलेल्या या सिनेमाकडून अनेकांना फार अपेक्षा आहेत. त्यामुळे या सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई अंदाजे ८ ते १० कोटींपर्यंत असेल असे म्हटले जाते.

पाहा या सिनेमाची काही आकर्षक पोस्टर्स

dear-zindagi-1

dear-zindagi-2

dear-zindagi-3

 या सिनेमाचे हटके टेक

सतत ऐकावी अशी गाणी