13 August 2020

News Flash

‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ फेम निखिलला करायचंय या बॉलिवूड अभिनेत्रीसोबत काम

आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी लॉकडाउनच्या काळात निखिल मेहनत घेत आहे.

निखिल दामले

‘झी युवा’ वाहिनीवरील ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ या मालिकेतील नचिकेत, म्हणजेच चार्मिंग आणि हँडसम अभिनेता निखिल दामले सगळ्यांचाच लाडका आहे. ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’मुळे तो घराघरात पोहोचला. या तरुण अभिनेत्याची स्वप्नंसुद्धा खूप मोठी आहेत. अनेक सेलिब्रिटी मंडळींनी लॉकडाउनकडे एक संधी म्हणून पाहिलेले आहे. सर्वजण स्वतःला पुरेसा वेळ देत आहेत. निखिलसुद्धा त्यांच्यापैकीच एक आहे. आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी लॉकडाउनच्या काळात निखिल मेहनत घेत आहे.

काही दिवसांपूर्वीच इन्स्टावर लाइव्ह येत, त्याने चाहत्यांशी संवाद साधला. त्याच्या या लाईव्ह सत्रात तो दिलखुलासपणे बोलत होता. त्याचं बालपण, अभिनेता होण्यासाठी त्याने केलेला प्रवास याविषयी तो मनमोकळेपणाने बोलला. पण, त्याच बरोबरीने, सध्या लॉकडाऊनच्या काळात, तो काय करत आहे, हे सुद्धा त्याने चाहत्यांना सांगितले. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळालेली असल्यामुळे, त्यांच्यासोबत पत्ते आणि कॅरम, हे त्याचे आवडीचे खेळ तो खेळत आहे. पण, हे करत असतानाच, वाचन करण्यासाठी तो खूप वेळ देत असल्याचे त्याने सांगितले. आवडीची बरीच पुस्तके त्याने लॉकडाऊनमध्ये वाचली आहेत. तसेच त्याच्या आवडीच्या वेब सिरीज आणि चित्रपट पाहण्यात सुद्धा तो फावला वेळ घालवतो आहे.

स्वप्नपूर्तीसाठी या गोष्टी गरजेच्या असल्याचे त्याचे म्हणणे आहे. भविष्यात हिंदी सिनेसृष्टीत अर्थातच बॉलीवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप पाडण्याची त्याची इच्छा आहे. आलिया भट्ट ही त्याची सर्वाधिक आवडती अभिनेत्री असून, तिच्यासोबत काम करायची संधी मिळायला हवी, असं त्याला मनापासून वाटतं. लाइव्हच्या माध्यमातून सगळ्यांशी मनमोकळा संवाद साधताना, आपल्या स्वप्नांबद्दल बोलत त्याने चाहत्यांना खुश केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 5:27 pm

Web Title: allmost suphal sampurna serial actor nikhil damle on lockdown and his dreams ssv 92
Next Stories
1 सलमानच्या ‘रेडी’ चित्रपटातील अभिनेत्याचं निधन
2 “पूर्व युपीमध्ये कुठेही उतरवा तिथून चालत गावी जाऊ” असं म्हणाऱ्याला सोनू सुदचा रिप्लाय, “नंबर पाठव…”
3 “मनोज वाजपेयींसमोर केला माझा अपमान”; नवाजुद्दीनच्या पत्नीचा आरोप
Just Now!
X