मुंबईमध्ये एका मॉडेलने बॉलिवूडमधील नऊ जणांवर बलात्कार आणि छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या अभिनेता जॅकी भगनानी आणि प्रसिद्ध फोटोग्राफर कॉलस्टन जूलियनसह अनेक बड्या व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे. या मॉडेलने फोटोग्राफर कॉलस्टन जूलियनवर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. तर अभिनेता जॅकी भगनानीसह आठ जणांवर विनयभंग केल्याचा आरोप केला आहे.

मॉडेलने केलेल्या आरोपांची दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मॉडेलच्या आरोपानुसार ती मुंबईत करिअर करण्यासाठी आली होती. यावेळी २०१४ ते २०१८ या चार वर्षांच्या काळात अनेक वेळा तिचा शारीरिक छळ आणि विनयभग करण्यात आला. अभिनेता जॅकी भगनानीने वांद्रे इथं या मॉडेलचं शोषण केल्याचं एअआयआरमध्ये नमूद करण्यात आलंय. तर नखिल कामतने सांताक्रूजमधईल एका हॉटेलमध्ये तिचा विनयभंग केला.

यांच्यावर दाखल झाला गुन्हा

मॉडेलने दाखल केलेल्या गुन्ह्यात इतर सात लोकांमध्ये टी-सीरीज चे कृष्ण कुमार. टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी क्वानचे सह-संस्थापक, अनिर्बान दास ब्लाह, शील गुप्ता, अजीत ठाकुर, गुरुज्योत सिंह आणि विष्णु वर्धन इंदुरी यांच्या नावांचा समावेश आहे.

मॉडेलच्या म्हणण्यानुसार ती मुंबईमध्ये अभिनयात करिअर करण्यासाठी आली होती. सिनेमात काम देण्याच्या नावाखाली तिची फसवणक करत ने फोटोग्राफर कोल्सटन जूलियनने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला असा तिचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणालाही ताब्यात घेतलेलं नाही.