30 September 2020

News Flash

NDRF चा अभिमान वाटतो – अमिताभ बच्चन

एनडीआरएफने केलेल्या कामगिरीचे कौतूक करणारे ट्विट अमिताभ यांनी केले आहे

कलाविश्वामध्ये मोठ्या प्रमाणावर सक्रीय असलेले बिग बी आजकाल सोशल मीडियावरही तितकेच अॅक्टीव्ह असताना दिसतात. अमिताभ अनेक वेळा ट्विटरच्या माध्यमातून त्यांची मते मांडत असतात. शुक्रवारी २६ जुलैरोजी वांगणी जवळ अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफने केलेल्या कामगिरीचे कौतूक करणारे ट्विट अमिताभ यांनी केले आहे.

अमिताभ यांनी त्यांच्या ट्विटवर अकाऊंटवर एनडीआरएफसाठी ट्विट केले आहे. ‘एनडीआरएफचे अभिनंदन. त्यांनी या एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या ७०० प्रवाशांची सुटका केली. एनडीआरएफ, वायुदल, नौदल, रेल्वे यांनी चांगली कामगिरी केली. ही एक साहसी आणि यशस्वी मोहिम होती’ असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले. त्यांचे हे ट्विट पाहता अमिताभ यांना अभिमान वाटत असल्याचे दिसत आहे.

Next Stories
1 दीपिकासाठी रणबीरची कुंकूऐवजी चटणीला पसंती?
2 शेतकरी ‘बाप’माणसाला सलाम! दिग्दर्शक प्रविण तरडेंची भावनिक पोस्ट व्हायरल
3 Bigg Boss Marathi 2 : शिवानी सुर्वे करते याला डेट
Just Now!
X