News Flash

Coronavirus : “जलसासमोर गर्दी करु नका”; बिग बींचे चाहत्यांना आवाहन

करोना व्हायरसमुळे अमिताभ बच्चन यांचे दर्शन झाले रद्द

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहाण्याचा प्रयत्न करतात. यावेळी त्यांनी चाहत्यांना एक आवाहन करण्यासाठी एक ट्विट केले आहे. “रविवारी माझ्या बंगल्यासमोर गर्दी करु नका” असं अमिताभ म्हणाले.

अमिताभ का म्हणाले असं?

सध्या जगभरात करोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही करोना व्हायरसचा धोका वाढल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान सरकारने कोठेही गर्दी न करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे अमिताभ यांनी रविवारी त्यांच्या घराजवळ त्यांना पाहाण्यासाठी गर्दी न करण्याचे आवाहन चाहत्यांना केले आहे. दर रविवारी अमिताभ आपल्या चाहत्यांची भेट घेण्यासाठी घराबाहेर पडतात. मात्र यावेळी ते करोना व्हायरसमुळे घराबाहेर पडणार नाहीत. त्यामुळे घरासमोर चाहत्यांना गर्दी न करण्याचे आवाहन त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केले आहे.

अमिताभ यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. काही चाहत्यांनी या निर्णयावर आपली नाराजी देखील व्यक्त केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2020 11:49 am

Web Title: amitabh bachchan cancels sunday meet due to coronavirus mppg 94
Next Stories
1 ‘पाच बॉयफ्रेंड असणं ही मुलीची मर्जी’; ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्यानंतर नेहा धुपिया म्हणते..
2 Coronavirus : हिंदू महासभेच्या ‘गोबर पार्टी’वर अनुराग कश्यपने दिली प्रतिक्रिया; म्हणाला…
3 थिएटर बंद! मग बार व रेस्टॉरंटना का सूट?; विजू मानेंचा सवाल
Just Now!
X