बॉलिवूडचे बिग बी म्हणून अभिनेते अमिताभ बच्चन ओळखले जातात. अमिताभ कलाविश्वात जेवढे सक्रिय आहेत तितकेच ते सोशल मीडियावरही सक्रीय असतात. अनेकदा ते त्यांचे विचार,मत ट्विटर किंवा इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर करत असतात. यात अनेकदा ते काही विनोददेखील शेअर करताना दिसतात. मात्र, यावेळी त्यांनी भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मावर विनोद केला आहे.
अमिताभ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा विनोद शेअर केला आहे. त्यांचा हा विनोद सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या विनोदासोबत त्यांनी एक फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोत अमिताभ यांनी कलरफूल रंगाची हूडी परिधान केली आहे. “रंग अजून उतरले नाही, आणि उत्साहाचे विनोद अजून थांबले नाहीत…अनुष्का आणि विराट यांच्याबद्दल आदरपुर्वक…ENGLISH- Anushka has a huge apartment ! हिंदीत- अनुष्का के पास विराट खोली है ।,” अशा आशयाचे कॅप्शन देत त्यांनी अनुष्का आणि विराटवर विनोद केला आहे.
View this post on Instagram
दरम्यान, अमिताभ आणि इम्रान हाश्मी यांचा ‘चेहरे’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, करोनाच्या दुसऱ्या लाटीमुळे प्रदर्शनाची तारिख पुढे ठकलण्यात आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा चित्रपट देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 4, 2021 3:08 pm