26 March 2019

News Flash

Amitabh Bachchan falls sick in Jodhpur: शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली

जोधपूरमध्ये सुरू होती शूटिंग

अमिताभ बच्चन

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली. आगामी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाचे जोधपूरमध्ये शूटिंग सुरू होते. त्याचवेळी त्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्या तपासणीसाठी मुंबईहून एक डॉक्टरांची टीम खासगी विमानाने जोधपूरला पाठवण्यात आली होती. बिग बींना मुंबईत परत आणण्याचे म्हटले जात होते. मात्र, तपासणीनंतर ते जोधपूरमध्येच राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.

आमिर खानच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाती शूटिंग जोधपूरमधील मेहरानगढ किल्ल्यावर सुरू होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. आमिर आणि चित्रपटाची संपूर्ण टीम तेथे उपस्थित होती. दरम्यान बिग बींनी सोमवारी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये त्यांच्या प्रकृतीविषयी उल्लेख केला होता. ‘काही लोक जगण्यासाठी काम करतात, खूप मेहनत घेतात. उद्या सकाळी डॉक्टरांची टीम माझी तपासणी करेल आणि त्यांच्यामुळे मी पुन्हा काम करण्यासाठी सज्ज होईन. सध्या मी आराम करत आहे पण याविषयी वेळोवेळी माहिती देत राहिन,’ असे त्यांनी या ब्लॉगमध्ये लिहिले आहे.

First Published on March 13, 2018 11:51 am

Web Title: amitabh bachchan falls ill while shooting doctors rushed from mumbai to jodhpur
टॅग Bollywood