12 November 2019

News Flash

…म्हणून ‘त्या’ चित्रपटानंतर आमिर खान- अमरीश पुरी यांनी एकत्र केलं नाही काम

अमरीश पुरी यांचा राग अनावर झाला आणि...

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि दिवंगत अभिनेता अमरीश पुरी हे दोन्ही कलाकार बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांपैकी आहेत.  मात्र ‘जबरदस्त’ या चित्रपटानंतर या दोघांनीही एकमेकांसोबत काम करण्याचं कटाक्षाने टाळलं.

१९८५ साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ‘जबरदस्त’ या चित्रपटातील एका सीनमुळे अमरीश पुरी आणि आमिर खान यांच्यामध्ये वाद झाले होते. या चित्रपटामध्ये अमरीश पुरी यांची मुख्य भूमिका होती. तर आमिर सहाय्यक दिग्दर्शकाच्या भूमिकेत होता. या चित्रपटातील एक सीन चित्रीत करत असताना अमरीश पुरी करत असलेलं काम आमिरच्या पसंतीत पडत नव्हतं. त्यामुळे याविषयी त्याने अमरीश यांना सांगितलं. परंतु त्यानंतर या दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. नंतर या दोघांनीही एकमेकांची माफी मागितली परंतु त्यानंतर हे दोघंही परत कधीच एकत्र दिसले नाहीत.

वाचा : Photo : सौमित्रच्या आईची भूमिका साकारणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का?

नासिर हुसेन दिग्दर्शित या चित्रपटातील एका सीनचं चित्रीकरण सुरु असताना आमिर अमरीश यांना काही सुचना करत होता. मात्र अमरीश यांनी आमिरच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. परंतु असं असताना सुद्धा आमिर त्यांना वारंवार सुचना करत होता. आमिरने लावलेला हा तगादा पाहून अमरीश पुरी यांचा राग अनावर झाला आणि ते सर्वांसमोर आमिरच्या अंगावर जोरात ओरडले. त्यानंतर त्यांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यांनी आमिरची माफीही मागितली. मात्र त्यानंतर आमिरने त्यांच्यासोबत कधीच एकत्र काम केलं नाही.

 

First Published on October 20, 2019 11:31 am

Web Title: amrish puri was angry with aamir khan jabardast movie set ssj 93