07 June 2020

News Flash

‘राझी’नंतर अमृता झळकणार ‘या’ हिंदी चित्रपटात

या चित्रपटाचं दिग्दर्शन मोहित सुरी करत आहेत

अमृता खानविलकर

मराठी चित्रपट सृष्टीतील ग्लॅमरस, संवेदनशील आणि सक्षम अभिनेत्री म्हणून कायमच अभिनेत्री अमृता खानविलकरचं नाव घेतलं जातं. मराठीमध्ये स्वत:ला सिद्ध केल्यानंतर तेवढ्यावर समाधान न मानता अमृताने हिंदी चित्रपटसृष्टी, रिअ‍ॅलिटी शो आणि वेबसिरीज सारख्या आधुनिक माध्यमांमध्येही स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करून लोकप्रिय होण्याची किमया साधली आहे. ‘सत्यमेव जयते’, ‘राझी’ या हिंदी चित्रपटामध्ये झळकलेली अमृता आता पुन्हा एकदा हिंदी चित्रपटामध्ये झळकणार आहे.

‘बॉलिवूड हंगामा’नुसार, अमृता लवकरच ‘मलंग’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटामध्ये दिशा पटानी आणि आदित्य रॉय कपूर यांची मुख्य भूमिका आहे. विशेष म्हणजे या कलाकारांसोबत अमृताही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अमृताने काही दिवसापूर्वीच चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मोहित सुरी करत आहेत.

दरम्यान, या चित्रपटाव्यतिरिक्त अमृता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ‘खतरों के खिलाडी १०’ या लोकप्रिय शोमध्येही झळकणार आहे. इतकंच नाही तर ती ‘पॉन्डेचेरी’ या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2019 10:21 am

Web Title: amruta khanvilkar joins aditya roy kapur disha patani starrer malangs cast ssj 93
Next Stories
1 ‘मन बैरागी’मधून पंतप्रधान मोदींचा जीवनप्रवास पडद्यावर, संजय लीला भन्साळी करणार निर्मिती?
2 ‘मुंबईकरांसाठी एकही दिवस गुड-डे नाही खड्डे’
3 रानू मंडल यांच्यानंतर उबर चालकाचंही गाणं व्हायरल
Just Now!
X