22 October 2020

News Flash

शिक्षणावरून प्रश्न उठवणाऱ्यांना अनन्या पांडेनं दिले पुरावे

अनन्या पांडे ही अमेरिकेतील प्रतिष्ठित विद्यापीठाच्या प्रवेशावरून  वादात  सापडली आहे.

अनन्या पांडे

‘स्टुडंट ऑफ द इअर २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी चंकी पांडेची मुलगी व अभिनेत्री अनन्या पांडे सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. अनन्या पांडे ही अमेरिकेतील प्रतिष्ठित विद्यापीठाच्या प्रवेशावरून  वादात  सापडली आहे. त्यावर आता अनन्याने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत प्रवेशाबाबतचा पुरावा दिला आहे.

प्रमाणपत्रांचे फाईल्स समोर ठेवून अनन्याने हा फोटो काढला आहे. ‘युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया’ची काही कागदपत्रं या फोटोत पाहायला मिळत आहेत. शिक्षणावरून तिची खिल्ली उडवणाऱ्यांना अनन्याने पुरावा दाखवत उत्तर दिलं आहे.

शिक्षण आणि अॅडमिशनची कागदपत्रं दाखवत अनन्याने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘मला हे करायचं नव्हतं. स्वत:ला सिद्ध करायची गरज आहे असं मला वाटलं नव्हतं. मात्र ‘युएससी’मध्ये माझं अॅडमिशन झालंच नाही अशा अफवा माझ्या अवतीभवती फिरत आहेत. सर्वांत वाईट गोष्ट म्हणजे माझ्या कुटुंबीयांना आणि मित्र-मैत्रिणींनाही या चर्चांचा सामना करावा लागत आहे.’ अनन्याने तिच्या पोस्टद्वारे सांगितले की चित्रपटाच्या शूटिंगमुळे तिला दोन वेळा प्रवेशप्रक्रिया पुढे ढकलावी लागली. प्रवेशप्रक्रिया मी आणखी पुढे ढकलू शकत नव्हती म्हणून अभिनयातच करिअर करण्याचा निर्णय मी घेतला.

View this post on Instagram

I didn’t want to do this. I didn’t feel like I needed to explain myself to anyone, but the rumours that I faked my admission at USC have been doing the rounds for a while now. They've been getting out of hand, and it’s even more unfair and sad that my family and friends have to go through this. As I've stated earlier, I was accepted by Annenberg School for Communication and Journalism at USC for a major in Communication in the Spring 2018 semester. But since I was shooting for my first film and the release date later got pushed, I had to request for a deferral (which means postponing my admission) twice – first to Fall 2018 and later to Fall 2019, both of which they gracefully agreed to do. In my case, I could only defer my admission two times so I will not be attending university (for now), since I’ve decided to pursue my career in acting. As for the people who have been trying to pull me down with these accusations, I would like to send you all lots of love, peace and positivity. And would also like to say that even though they’re claiming to be my classmates (nameless and faceless) – I'm sure they aren’t because I’ve grown up with the people I went to school with and they would never do something like that. It's never okay to bully anyone – creating fake conversations, stories and screenshots is very dangerous and can seriously damage people’s lives. So please be loving, positive and kind. ❤ (PS – my father’s real name is Suyash and I blurred out my address for security reasons)

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday) on

‘जे लोक मला खाली पाडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना माझ्याकडून खूप सारं प्रेम, शांती आणि सकारात्मकता. कारण जे माझे क्लासमेट्स असल्याचा दावा करत आहेत ते माझे क्लासमेट्स नाहीत. कारण ज्यांच्यासोबत मी लहानाची मोठी झाली, ज्यांच्यासोबत मी शाळेत गेली ते माझ्यासोबत असं कधीच वागणार नाहीत किंवा माझ्यावर आरोप करणार नाहीत,’ असंही तिने स्पष्ट केलं.

अमेरिकेतील विद्यापीठात प्रवेश घेतला असल्याची खोटी माहिती अनन्या देत असल्याचं काहींचं म्हणणं आहे. या विद्यापीठातील एका विद्यार्थीनीनं अनन्या  नावाच्या कोणत्याही व्यक्तीनं प्रवेश घेतला  नसल्याचा दावा  केला. त्यानंतर अनन्याला ट्रोल करण्यात आलं.

‘स्टुडंट ऑफ द इअर २’मधील अनन्याच्या अभिनयाची प्रेक्षकांकडून प्रशंसा झाली. ती ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार आहे. यामध्ये तिच्यासोबत कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकर यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2019 1:56 pm

Web Title: ananya panday shuts down rumors of her lying about usc posts pics of admission letter on instagram ssv 92
Next Stories
1 विराट प्रेमात पडावं असाच आहे; अनुष्कानं सांगितलं अनोखं कारण
2 ठाम भूमिका घेणाऱ्या गिरीश कर्नाड यांची उणीव भासेल: राज ठाकरे
3 सलमानच्या ‘भारत’ची घोडदौड सुरूच; पाच दिवसांत कमावले इतके कोटी रुपये
Just Now!
X