बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप त्याच्या चित्रपटांसोबतच त्याने केलेल्या ट्विटमुळे आजकाल चर्चेत असतो. बऱ्याच वेळा अनुराग सोशल मीडियाद्वारे सामजिक विषयांवर त्याची मते मांडत असतो. पण बऱ्याच वेळा त्याला ट्रोलिंगचा देखील सामना कारावा लागला आहे. नुकताच अनुरागने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये एका यूजरने अनुरागला नक्षलवादी असे म्हटले आहे. पण यावेळी अनुरागने ट्रेलरला सडेतोड उत्तर देत प्रश्न विचारला आहे.

एक ट्विटर यूजरने ‘काम नक्षलवाद्यांचं करता आणि त्या देशाची लोकशाही पाहिजे. आधी स्वतः सुधर’ असे म्हणत अनुरागला सुनावले होते. आता अनुरागने त्याच्या या ट्विटवर उत्तर दिले आहे. ‘चला मी आज विचारतो. भाई नक्षलवादीचा अर्थ सांगा मला आणि खरा अर्थ सांग. कारण त्याच अर्थामध्ये पुढचा प्रश्न लपलेला आहे’ असे अनुराग म्हणाला आहे. सध्या सोशल मीडियावर अनुरागच्या या ट्विटची जोरदार चर्चा सुरु आहे.

काही दिवसांपूर्वी अनुरागने नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनात सहभाग दर्शवला होता. त्याने ट्विटरवर ट्विट करत मोदींवर टीका केली होती. या ट्विटनंतर त्याच्या ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या कमी झाल्याचा अप्रत्यक्ष दावा त्याने केला असून ट्विटर इंडियावर निशाणा साधला होता.