चित्रपट हा जगातील सर्वात मोठ्या उद्योगांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्यामुळे चित्रपटात काम करण्याची एक संधी मिळावी यासाठी जगभरातील लोक सातत्याने प्रयत्न करत असतात. संधी मिळेल तिथे आपलं टॅलेंट दाखवतात. अगदी युट्युब, फेसबुक, इन्स्टाग्राम, टिक-टॉक अशा जवळपास सर्वच सोशल मीडिया साईटवर असे अभिनय वेडे लोक दिसतात. असेच एक ऑडिनश दिग्दर्शक अनुराग कश्यपसाठी एका तरुणाने दिले आहे. Bhai .. tu to aankhon se hi maar daale kisi ko .. uff hai yaar — Anurag Kashyap (@anuragkashyap72) March 24, 2020 अनुरागने नरेंद्र मोदींनी केलेल्या लॉकडाऊनच्या घोषणेवर टीका करण्यासाठी एक ट्विट केले होते. या ट्विटवर रिप्लाय म्हणून एका तरुणाने एक ऑडिशन व्हिडीओ पोस्ट केला आहे. या तरुणाला चित्रपटात खलनायकाची भूमिका हवी आहे. "सर अॅक्टिंग माझं पॅशन आहे. हा माझा ऑडिशन व्हिडीओ आहे. कृपया चित्रपटात काम करण्याची एक संधी मला द्या. असे म्हणत त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. अनुरागने देखील "भावा तू तर डोळ्यांनीच एखाद्याला घायाळ करशील" असं म्हणत त्याला गंमतीशीर रिप्लाय दिला आहे. ऑडिशन देणाऱ्या या तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्याच्यावर काही गंमतीशीर कॉमेंट देखील केल्या आहेत.