03 March 2021

News Flash

व्हायरल झालेल्या मीम्सवर पहिल्यांदाच बोलताना अनुष्का शर्मा म्हणाली…

वरुणने अनुष्काला मीम्स की राणी म्हटले, त्यावर अनुष्का ट्विट करत म्हणाली...

व्हायरल झालेले मीम्स

‘सुई धागा’ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मिडियावर या सिनेमातील कलाकारांना ट्रोल केले जात आहे. यातही खास करुन अभिनेत्री अनुष्का शर्माला तिच्या अभिनयावरून ट्रोल केले जात आहे. मागील दोन तीन आठवड्यांमध्ये अनुष्काबद्दलचे हे ट्रोल करणारे फोटो आणि व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर चांगलेच व्हायरल होत आहेत. मात्र पहिल्यांदाच अनुष्का या ट्रोल्सवर रिअॅक्ट झाली आहे.

चेहऱ्याला हात लावून खाली बसलेल्या अनुष्काच्या रडक्या एक्सप्रेशनचे फोटो अनेकांनी एडिट करून भन्नाट मीम्स बनवले आहेत. असाच एक मजेदार व्हिडीओ सुई-धागामधील अनुष्काचा सहकलाकार अभिनेता वरुण धवन याने कोट करुन रिट्विट केला. या ट्विटमध्ये सिनेमाच्या ट्रेलरमधील रडकी अनुष्का प्रियंका चोप्रा आणि निक जोनच्या समोर बसलेली दाखवण्यात आली आहे. या ट्विटरवर नीकराव गणपतीची आरती करताना आढळले, असे वाक्य लिहीलेले आहे. हा व्हिडीओ ट्विटमध्ये कोट करत वरुणने अनुष्काला मीम्स की राणी ममता असं म्हटलं आहे.

वरुणच्या या ट्विटला कोट करत अनुष्कानेही त्याला रिप्लाय दिला. हसण्याचे आणि टाळ्या वाजवण्याचे इमोन्जी वापरून तिनेही या मीमला सुपर्ब म्हणत दाद दिली आहे.

अनुष्का आणि वरुणचा हा सिनेमा २८ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याआधीच या दोघांनीही सोशल मिडियावरून या सिनेमाचे प्रमोशन सुरु केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2018 11:09 am

Web Title: anushka sharma reacts on memes of howling face from sui dhaaga
Next Stories
1 PUBG मध्ये महिंद्राचा ट्रॅक्टर पाहताच नेटकरी सैराट
2 ‘इट का जवाब राधिका से…’, झोमॅटो आणि नेटफ्लिक्स इंडियाची राधिका आपटेवरुन जुंपली
3 विवेक अग्निहोत्रींच्या अंगलट आला #UrbanNaxals हा हॅशटॅग
Just Now!
X