राज्यासह देशाला वेड लावणाऱ्या ‘सैराट’ या लोकप्रिय चित्रपट राज्याची वेस पार करुन कर्नाटकच्या बोली भाषेत प्रदर्शित होणार आहे. मराठी नंतर अन्य भाषेत चित्रित हाणाऱ्या या चित्रपट सर्वप्रथम कन्नड भाषेमध्ये रिमेक होणार आहे. सैराट चित्रपटाच्या कन्नड रिमेकच्या चित्रिकरणाला नुकतीच सुरुवात झाली. ‘सैराट’मध्ये आपल्या मराठी बोली भाषेने सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली आर्ची अर्थात रिंकु राजगुरु या चित्रपटात आपल्या कन्नड भाषेने वेड लावणार का? याची उत्सुकता असेल. सैराट चित्रपटाने राज्यालाच नव्हे तर परदेशातही लोकप्रियता मिळवली होती. या चित्रपटाला देशातील विविध राज्यातील रसिकांनी पसंती दिल्यामुळे या चित्रपटास वेगवेगळ्या भाषेत रिमेक होणार याच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चेला कर्नाटक निर्मात्यांनी पूर्ण विराम दिला. मराठी नंतर एस. नारायण ‘सैराट’चे कन्नडमध्ये दिग्दर्शन करीत आहेत. आर्चीच्या लोकप्रियतेला टक्कर देणारा चेहरा कर्नाटकमध्ये मिळाला नसल्याने आर्ची या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसेल.

कन्नडमध्ये निर्माण होणाऱ्या ‘सैराट’ चित्रपटासाठी हजारहून अधिक मुलींचे ऑडिशन घेण्यात आले होते. पण आर्चीच्या भूमिकेला न्याय देऊ शकेल असा एकही चेहरा निर्माता रमेश यांना दिसला नाही. शेवटी दिग्दर्शक एस. नारायण यांच्या नजरेने रिंकु राजगुरुने हीला पसंती देण्यात आली. यंदा १० वी चे वर्ष असल्यामुळे रिंकु याला होकार देईल की नाही, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र अखेरीस दिवाळीपूर्वीच सैराट चित्रपटाच्या कन्नड रिमेकच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे. सध्या ‘सैराट’च्या कन्नड रिमेकमधील चित्रिकरणावेळीचे काही फोटो लिक झाले असून ‘सैराट’मधील आर्ची आणि परशा आपल्या मुलासह प्लॅट बघायला जातात हा सीन सुरू असतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसते.