News Flash

Avengers Endgame : प्रदर्शनापूर्वीच सुपरहिट

Avengers: Endgame हा २०१९ मधील सर्वात मोठा चित्रपट येत्या २६ एप्रिलला प्रदर्शित होत आहे.

चित्रपटाचा आवाका जितका मोठा तितकाच जास्त खर्च त्यांच्या निर्मितीसाठी करावा लागतो आणि आर्थिक गुंतवणूक जर मोठी असेल तर त्यातून मिळणारा परतावा देखील तितकाच मोठा असावा असा एक साधा सरळ व्यवसायिक दृष्टीकोन मनाशी बाळगून चित्रपट उद्योगात गुंतवणूक केली जाते. माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा Avengers: Endgame हा २०१९ मधील सर्वात मोठा चित्रपट येत्या २६ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. तब्बल ३२ सुपरहिरो असलेल्या या सुपरहिरोपटात निर्मात्यांनी १००० कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. त्यामुळे व्यवसायिक दृष्टीकोनातून विचार करता निर्मात्यांना गुंतवणुकीपेक्षा जास्त नफा मिळवणे अपेक्षित आहे. परंतु यावर तोडगा काढण्यासाठी निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शनाआधीच तिकीटीची थेट विक्री करण्यास सुरुवात केली. २६ मार्च पासून चित्रपटाचे प्री-बुकिंग सुरु झाले आणि आश्चर्याची बाब म्हणजे पहिल्या दोन दिवसांत अ‍ॅव्हेंजर्सने २०० कोटींची कमाई करत प्रदर्शनापूर्वीच सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट असा एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.

याआधी द थर्टीन्थ वॉरियर, द फॉल ऑफ रोमन एम्पायर, द अ‍ॅडवेंचर ऑफ प्लुटो नॅश, ४७ रॉबिन यांसारखे अनेक चित्रपट आले. ज्यांचा आर्थिक आवाका अ‍ॅव्हेंजर्स इतकाच मोठा होता. परंतु ढिसाळ नियोजन व विक्री कौशल्यात काही त्रुटी राहिल्यामुळे वर्षातील सर्वात जास्त कमाई करणारे चित्रपट ठरुन देखील निर्मात्यांना गुंतवणुकीपेक्षा जास्त नफा मिळवण्यात अपयश आले. परिणामी इतिहासातील सर्वात सुपरफ्लॉप सिनेमांचा शिक्का त्यांच्याबर बसला. Avengers: Endgame या सुपरहिरोपटाची घोषणा झाल्यापासूनच त्यात केल्या जाणाऱ्या खर्चाचे आकडे सातत्याने चर्चेत होते. जसजसा चित्रपटातील कलाकारांचा ताफा वाढत गेला तसतसा खर्चाचा आकडाही वाढत गेला. सध्या ही संख्या हजार कोटींच्या घरात जाउन बसली आहे. इतर उद्योगधंद्यांप्रमाणेच चित्रपट क्षेत्रातही नफा मिळवण्याच्या उद्देशानेच गुंतवणूक केली जाते.

एकूण गुंतवणुकीपैकी २० टक्के रक्कम Avengers: Endgame ने कमावली असली तरी चित्रपट प्रदर्शीत होणे अद्याप बाकी आहे. आजवर अनेक चित्रपट असे आले ज्यांनी प्रदर्शनापुर्वी अगाउ तिकीट विक्रीव्दारे चांगली कमाई केली. परंतु प्रदर्शनानंतर इंटरनेट पायरसी, खराब रिव्ह्यू, आणि इतर चित्रपटांच्या दबावामुळे त्यांना अपेक्षित नफा मिळवता आला नाही. या पार्श्वभूमीवर विचार करता हीच बाब अ‍ॅव्हेंजर्सच्या बाबतीतही खरी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अपेक्षित सुरवात होउन देखिल अ‍ॅव्हेंजर्स निर्माते अद्याप दबावात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2019 3:06 pm

Web Title: avengers endgame super hit before released
Next Stories
1 नवल ते काय?, ब्लॅकमधला राणीसारखा अभिनय मीदेखील करू शकते – कंगना
2 ‘केसरी’ ठरला २०१९ मधला सर्वाधिक वेगाने १०० कोटींची कमाई करणारा चित्रपट
3 अक्षय कुमारच्या मेव्हण्याचं बॉलिवूडमध्ये पदार्पण
Just Now!
X