छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘बालिका वधू’मध्ये आनंदी हे पात्र अभिनेत्री अविका गौरने साकारले होते. काही दिवसांपूर्वी तिचे ग्लॅमरस अंदाजातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता तिचा एक डान्स व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
अविकाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती ‘मिर्ची’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओमधील अविकाचा डान्स पाहण्यासारखा आहे.
View this post on Instagram
सध्या सोशल मीडियावर अविकाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. व्हिडीओमध्ये अविकाने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत.
अविकाने तिच्या करिअरची सुरुवात बालिका वधू या मालिकेतून केली होती. या मालिकेतील तिची ‘छोटी आनंदी’ ही भूमिका विशेष गाजली होती. आजही अनेकांना तिची ही भूमिका लक्षात आहे. त्यानंतर तिने ‘ससुराल सिमर का’ या मालिकेत काम केले. या मालिकेतील तिच्या भूमिकेला देखील चाहत्यांचे प्रेम मिळाले. तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील भूमिका साकारली आहे.