News Flash

रामलीलामध्ये सीताची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या रवि किशनचे असे बदलले नशीब

रवि फार मोठा शीव भक्तही आहे

रवि किशन

भोजपुरी स्टार रवि किशनचे नाव आज यशस्वी अभिनेत्यांच्या यादीत समाविष्ट झाले असेल. भोजपुरी सिनेमांचा अमिताभ बच्चन अशी ओळख असलेल्या रवी किशनचे असंख्य चाहते आहेत. पण त्याला सहजासहजी यश मिळालेलं नाही. यासाठी त्याने अथक मेहनत घेतली होती. जमिनीवरून आभाळापर्यंत पोहचण्याचा रविचा प्रवास खूप काही शिकवणारा आहे. रवि स्ट्रगलच्या दिवसांमध्ये निर्मात्यांच्या ऑफिस बाहेर तासन् तास उभा राहायचा. एवढेच नाही तर तो रामलीलामध्ये सीताची व्यक्तिरेखाही साकारायचा. रवि यांचे वडील पंडित होते. पंडिताच्या मुलाने अभिनय करणे कुटुंबातील सर्व व्यक्तींना मान्य नव्हते. एकदिवस रविच्या आईने त्याला घरातून पळून जाण्याचा सल्ला दिला. त्या रविला म्हणाल्या की, जर तू घरातून पळून गेला नाहीस तर तुझे बाबा तुला मारुन टाकतील. हे ऐकून रवि १९९० मध्ये गाव सोडून मुंबईत आला.

सोशल मीडियावर रविचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रवि त्याच्या खासगी तसेच व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलताना दिसतो. रवि या व्हिडिओमध्ये म्हणतो की, मिथुन आणि गोविंदानंतर मीच असा अभिनेता आहे ज्याने खऱ्या अर्थाने स्ट्रगल केले. रविने एक दोन नव्हे तब्बल १० ते १२ वर्ष सिनेसृष्टीत काम केले. पण त्या कामाचे पैसेच रविला मिळायचे नाही. ती वेळ अशी होती की तुम्हाला पैसा तरी मिळेल किंवा काम. रविने त्याच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगताना म्हटले की, अनेकदा निर्माते सकाळी दिलेले पैसे पॅकअप झाल्यानंतर पुन्हा मागून घ्यायचे. या सिनेसृष्टीत प्रत्येकजण चालत आला आहे. पण मी मात्र रांगत आलो आहे.

रविला सुरुवातीच्या काळात बी ग्रेड सिनेमेच मिळत गेले. या सिनेमांमधून त्याने ५००० रुपये कमवले. या पैशांतून त्याने एक बाइक विकत घेतली. रविला तेरे नाम या सिनेमांतून बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली. या सिनेमात रविने जे कपडे वापरले होते ते त्याच्या वडिलांचे होते. जेव्हा रवि बॉलिवूडमध्ये सिनेमे मिळवण्यासाठी धडपडत होता. तेव्हाच त्याला भोजपुरीमध्येही सिनेमांच्या ऑफर्स येत होत्या. हळू- हळू रवि भोजपुरी सिनेसृष्टीतलं मोठं नाव होत गेलं. त्याच्या गावातले गावकरी त्यांच्या मुलांची नावं रवि किशन अशी ठेवतात.

रवीला स्टार घडवण्यात बिग बॉसचाही फार मोठा हात आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर निघाल्यानंतर त्याच्याकडे सिनेमांच्या ऑफर्सचा पाऊस पडू लागला. अभिनयाशिवाय रवीला नृत्याचीही आवड आहे. जेव्हा तो ८ वर्षांचा होता तेव्हा दुसऱ्यांच्या लग्नात आणि गणपती पुजेमध्ये डान्स करायचा. रवि फार मोठा शीव भक्तही आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2018 6:15 am

Web Title: bhojpuri star ravi kishan used to play sita in ramlila such a replacement fortune
Next Stories
1 पठडीबाहेरच्या सिनेमांनी एप्रिल ‘फुल्ल’
2 ‘पत्थरबाजी ठीक, पर तिरंगा जलाना बर्दाश्त नहीं’, ‘बागी २’ चे हे दमदार संवाद ऐकले का?
3 सलमानने घेतला रणवीर सिंगचा धसका?
Just Now!
X