बिग बी अमिताभ बच्चन वयाच्या ७८ व्या वर्षी जितके अभिनयात सक्रिय आहेत तितकेच सक्रिय ते सोशल मीडियावर देखील आहेत. बिग बींचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. बिग बी अमिताभ बच्चन वेगवेगळ्या मुद्यांवर कायम ट्वीट करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. मात्र बिग बींनी नुकत्याच केलेल्या एका ट्वीटमुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आलंय.

अमिताभ बच्चन यांनी १७ जुलैला एक ट्वीट केलंय. यात ते म्हणाले, “लिहायला काही नाही”. बिग बींच्या या ट्वीटवर त्यांना सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आलंय. अनेकांनी बिग बींना जर लिहायला काही नसेल तर त्यांनी काय लिहावं हे सुचवंल आहे. एक युजर म्हणाला, “मग पेट्रेलबद्दल लिहा.”

बिग बी अमिताभ बच्चन यांनी २०१२ सालात पेट्रोलच्या दरवाढीवरू एक मजेशीर पोस्ट लिहिली होती. या जुन्या ट्वीटचा स्क्रीनशॉट शेअर करत काहींनी त्यांना ट्रोल केलंय. युजर म्हणाला, “हो नक्कीच लिहिण्यासाठी आहे. थोडी जरी लाज शिल्लक असेल तर यावेळी पेट्रोलवर काही बेधडक लिहून दाखवा.”

तर आणखी एक युजर म्हणाला, “२०१३ सालात मोदीजींनी जितके पैसे तुम्हाला पेट्रोलवर ट्वीट करण्यासाठी दिले होते. त्याहून दुप्पट आम्ही सर्व भारतीय तुम्हाला देऊ. रोज फक्त पेट्रोलचा दर ट्वीट करा.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान कामाबद्दल सांगायचं झालं तरबिग बी लवकरच ‘चेहेरे’ या सिनेमात झळकणार आहेत. हा सिनेमा तयार असून प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. याशिवाय नागराज मंजुळेच्या ‘झुंड’ या सिनेमातही ते झळकणार आहेत. तसचं ब्रह्मास्त्र, मेडे और गुडबाय या सिनेमाच्या प्रोजेक्टवर ते काम करत आहेत.