‘कौन बनेगा करोडपती’ या शोची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या शोमध्ये अनेकजण आपलं नशीब आजमावतात. शिवाय बॉलिवूडचे महानायक बिग बींसोबत मनसोक्त गप्पा मारतात. हॉट सीटवर बसणाऱ्या प्रत्येक स्पर्धकासोबत शोचे होस्ट बिग बी अमिताभ बच्चन मनसोक्त गप्पा मारत त्यांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. स्पर्धकांकडून त्यांच्याबद्दल जाणून घेत असताना बिग बी अमिताभ बच्चन अनेकदा आपल्या आयुष्यातील, कुटुंबातील तसचं बॉलिवूडमधील किस्से शेअर करत असतात.
नुकत्यात पार पडलेल्या एपिसोडमध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपली नात आराध्याच्या आभ्यासाबद्दल सांगितलं आहे. यंदाच्या भागात या शोमध्ये मध्यप्रदेशमध्ये एका शाळेत मुख्याध्यापिका असलेल्या कल्पना यांना हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली होती. यावेळी कल्पना यांनी त्यांना शिकवण्याची आवड असून त्यांनी ऑनलाइन शिक्षण प्रणालीशी कसं जुळवून घेतलं याचा अनुभव शेअर केला. तसचं करोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांना खूप मिस केल्याचं देखील त्या म्हणाल्या. ऑनलाइन शिक्षण सुरु करणाऱ्या काही पहिल्या शाळांपैकी एक त्यांची शाळा असल्याचं त्यांनी अभिमाने सांगितलं.
यावेळी बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील त्यांची नात आराध्याच्या ऑनलाइन क्लासबद्दल सांगितलं. आराध्याच्या ऑनलाइन क्सालमध्ये तिचे आई वडील म्हणजेच अभिषेक आणि ऐश्वर्या मदत करत असल्याचं ते म्हणाले. अभिषेक आणि ऐश्वर्या दोघेही आराध्यासोबत तिच्या ऑनलाइन क्लासमध्ये तिला कंप्युटर ऑपरेट कसा करावा, तसचं पीपीटी आणि इतर गोष्टींमध्ये मार्गदर्शन करतात असा खुलास बिग बींनी केला.
View this post on Instagram
हे देखील वाचा: सीटी स्कॅन करण्याचा सल्ला देणं मिलिंद सोमणला महागात, नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
तसचं आराध्या ऑनलाइन क्लासमध्ये जेव्हा योगाचे धडे घेत असते तेव्हा ते पाहणं हे खूपच सकारात्मक आणि तितकच मजेशीर असून आपण ते एन्जॉय करत असल्याचं बिग बी म्हणाले.
या खास भागात बिग बींनी त्यांच्या शालेय दिवसातील काही आठवणींना देखील उजाळा दिला. बालपणापासूनच सिनेमा पाहण्याची आवड असल्याचं बिग बी म्हणाले.