05 December 2020

News Flash

आईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू

जान सानूने मराठी भाषेविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.

जान सानू, कुमार सानू

प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू याने ‘बिग बॉस १४’च्या घरात मराठी भाषेविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. मराठी भाषेची चीड येते, असं विधान त्याने केल्यानंतर सर्वच स्तरातून त्याच्यावर टीका झाली. याप्रकरणी कलर्स वाहिनीने, जान सानूच्या आईने आणि स्वत: जान सानूने माफी मागितल्यानंतर आता त्याचे वडील कुमार सानू यांनी संपूर्ण महाराष्ट्राची हात जोडून माफी मागितली आहे.

एका व्हिडीओद्वारे कुमार सानू यांनी मुलाच्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. “गेल्या ४१ वर्षांत मला महाराष्ट्राने आणि मुंबईने खूप काही दिलंय. मुंबईबद्दल किंवा महाराष्ट्राबद्दल मी कुठलीच चुकीची गोष्ट माझ्या मनातसुद्धा आणू शकत नाही. पण माझ्या मुलाने खूप मोठी चूक केली आहे. त्याच्या आईने त्याला कशी शिकवण दिली माहित नाही, पण त्याच्या वडिलाच्या नात्याने मी सर्वांची हात जोडून माफी मागतो. गेले २७ वर्षे तो माझ्यासोबत राहत नाही”, असं ते म्हणाले.

व्हिडीओ सौजन्य- सामना ऑनलाइन

आणखी वाचा- समजून घ्या : जान कुमार सानूशी संबंधित मराठी भाषेवरुनचा वाद नक्की आहे तरी काय?

यापूर्वी जान कुमार सानूने मागितली माफी

मराठीचा मुद्दा वादग्रस्त ठरल्यानंतर बिग बॉसच्या कन्फेशन रूममध्ये जान सानूला समज देण्यात आली. तसंच या ठिकाणी सर्वांच्या भावनांचा आदर केला जात असून जान सानूनं केलेली चूक पुन्हा होऊ नये असंही बिग बॉसकडून सांगण्यात आलं. “मी काही दिवसांपूर्वी नकळत एक चूक केली. त्यामुळे मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे मी सर्वांची माफी मागतो. मराठी भाषिकांना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता,” अशा शब्दात त्याने सर्वांची माफी मागितली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 10:55 am

Web Title: bigg boss 14 kumar sanu questions upbringing his mother gave to son jaan sanu ssv 92
Next Stories
1 कुणाल खेमूने काढून घेतला भन्नाट टॅटू, पाहा ३० तास घालवून काढलेल्या या टॅटूची खासियत
2 अभिनय बेर्डे-मयुरेश पेम देणार लक्ष्मीकांत बेर्डे व दादा कोंडके यांना मानवंदना
3 रामायणातील ‘सीता’ साकारतेय अफजल गुरूच्या पत्नीची भूमिका; पाहा ट्रेलर
Just Now!
X