बिग बॉसच्या फायनलमध्ये जाण्याची संधी अरमान कोहलीने गमावली आहे. आज होणा-या एव्हिक्शनमध्ये तो बाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
याच आठवड्यात त्याला पोलिसांनी अटकही केली होती. मात्र, जामीन मिळाल्यानंतर तो पुन्हा बिग बॉसच्या घरात दाखल झाला होता. त्यावेळी तनिषाच्या चेह-यावरचा आनंद हा पाहण्यासारखा होता. तनिषाचा हा आनंद बिग बॉसने जास्त वेळ टिकू दिलेला नाही. कुशाल आउट झाल्यानंतर गौहर एकटी पडली आहे आणि आता अरमानच्या जाण्याने तनिषा. त्यामुळे बिग बॉसमधल्या दोन प्रसिद्ध प्रेमिकांच्या जोड्या वेगळ्या झाल्याचे चित्र दिसते.
अरमान हा प्रतिस्पर्धकांशी सतत भांडणामुळे वादाच्या भोव-यात राहत होता. मात्र, तनिषा आणि अॅण्डीशी त्याची चांगली मैत्री होती.
संग्रहित लेख, दिनांक 21st Dec 2013 रोजी प्रकाशित
अरमान कोहलीची ‘बिग बॉस’मधून गच्छंती, तनिषा पडली एकटी
बिग बॉसच्या फायनलमध्ये जाण्याची संधी अरमान कोहलीने गमावली आहे.

First published on: 21-12-2013 at 04:14 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 7 armaan kohli evicted from the show