अभिनेता आमिर खानने वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी सोशल मीडियावरुन चाहत्यांचा निरोप घेतला आहे. सोशल मीडियाला पाठ फिरवण्यामागचं कारण आमिरने सांगितलं नसलं तरी त्याच्या या निर्णयामुळे त्याचे चाहते दुखावले गेले आहेत.
आमिर खाननंतर आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याने सोशल मीडियाला राम राम ठोकला आहे. प्रसिद्ध बॉलिवूड आणि टेलिव्हिजन अभिनेता सुशांत सिंहने सोशल मीडियापासून काही काळ ब्रेक घेतला आहे. अभिनेता सुशांत सिंहने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही माहिती दिलीय. त्याने एका ट्विटचा स्क्रिनशॉट शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिलीय .”सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन ब्रेक घेतोय, रिबूट होण्याची गरज आहे.” असं या पोस्टमध्ये त्याने लिहलं आहे. सुशांतच्या या निर्णयानंतर काही चाहते दुखावले गेले आहेत. तर काहींनी त्याच्या या निर्णयाचं कौतुक केलंय.
View this post on Instagram
2002 सालात आलेल्या ‘द लेजंड ऑफ भगत सिंग’ तसंच विरुद्ध, जंगल या सिनेमांसोबतच ‘सावधान इंडिया’ या क्राईम शोचं सूत्रसंचालन आणि अनेक वेब सीरिजमधून सुशातंने वेगवेगळ्या हटके भूमिका साकारल्या आहेत.
View this post on Instagram
नुकतच आमिर खानने देखील सोशल मीडियाला ब्रेक दिलाय. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर अशा तिनही प्लॅटफॉर्मवरली त्याने त्याचे अकाऊंट डिलीट केले आहेत.