11 July 2020

News Flash

सारा-कार्तिकच्या इंटिमेट सीनवर सेन्सॉर बोर्डाची कात्री; व्हिडीओ मात्र चर्चेत

बोल्ड सीन 'ब्लर' करण्याचे निर्देश दिले.

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांचा बहुचर्चित ‘लव्ह आज कल’ हा चित्रपट येत्या व्हॅलेंटाइन डेला (१४ फेब्रुवारी) प्रदर्शित होणार आहे. कार्तिक-सारा मिळून या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. सेन्सॉर बोर्डाने नुकतंच या चित्रपटाला ‘अ’ प्रमाणपत्र दिले असून त्यातील काही इंटिमेट दृश्यांना कात्री लावली आहे.

चित्रपटातील सारा आणि कार्तिक यांचे काही इंटिमेट सीन काढून टाकण्याचे निर्देश सेन्सॉर बोर्डाने दिग्दर्शकांना दिले आहेत. सारा-कार्तिकच्या किसिंग सीनला कात्री लावण्यासोबतच काही प्रणयदृश्ये ‘ब्लर’ करण्यास सांगण्यात आले आहेत.

आणखी वाचा : दिल्लीकरांनी प्रत्येक भारतीयाच्या मनातील संदेश दिला – अवधूत गुप्ते

इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटाच्या निमित्ताने सारा आणि कार्तिक पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. या दोघांच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्रीसोबतच ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सारा-कार्तिकचा एक किसिंग व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आता सेन्सॉर बोर्डाने किसिंग सीनलाच कात्री लावल्याने पुन्हा एकदा तो व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या चित्रपटात रणदीप हुडा आणि आरुषी शर्मा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याआधी २००९ मध्ये सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असलेला ‘लव्ह आज कल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता सारा-कार्तिकच्या चित्रपटाची संकलप्ना जरी तशीच असली तरी दोन वेगवेगळ्या पिढ्यांची कथा यामध्ये दाखवण्यात आल्याचं इम्तियाज म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2020 2:20 pm

Web Title: cbfc asks to chop and modify intimate scenes from love aaj kal kartik aaryan and sara ali khan ssv 92
Next Stories
1 ‘सकारात्मक राहण्याशिवाय काहीच पर्याय नाही’; कर्करोगाशी झुंज देणाऱ्या इरफानचा हृदयस्पर्शी व्हिडीओ
2 ऑस्कर विजेत्या ‘पॅरासाइट’ची कथा तामिळ चित्रपटातून चोरल्याचा नेटकऱ्यांचा आरोप
3 “काश्मीर समस्या सोडवली, तर पाकिस्तानी लष्काराला पैसे मिळण्याचा मार्ग बंद होईल”
Just Now!
X