News Flash

३६ दिवसानंतरही अभिनेता अनिरूद्ध दवेची करोनाशी झुंज सुरूच; सेल्फी शेअर करत दिली हेल्थ अपडेट

एखाद्या नवजात बाळाप्रमाणे चालायचा प्रयत्न करतोय. ऑक्सिजन सपोर्ट सुरू आहे, पण फुप्फुसांमध्ये सुधारणा होतेय.

(Photo:Instagram@aniruddh_dave)

‘पटियाला बेब्स’ फेम अभिनेता अनिरूद्ध दवेची करोनाशी झुंज अजुन संपलेली नाही. गेल्या ३६ दिवसांपासून रूग्णलयात त्याची करोनाविरोधात लढाई सुरूच आहे. करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर ३४ वर्षीय अभिनेता अनिरूद्ध दवेला ताबडतोब रूग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. अनिरूद्ध याच्यावर गेले १४ दिवस आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. आज त्याने एक सेल्फी शेअर करत त्याने त्याची हेल्थ अपडेट दिली आहे. आज त्याचा रूग्णालयातला ३६ वा दिवस असून आता तो ऑक्सिजन सपोर्टशिवाय श्वास घेतोय.

अनिरूद्ध दवे याने त्याच्या ट्विटर अकाउंटवर हा सेल्फी शेअर केलाय. या सेल्फीमध्ये त्याच्या नाकात पाईप लावला असल्याचं दिसून येत आहे. यासोबतच त्याने एक पोस्ट देखील शेअर केली आहे. यात त्याने लिहिलं, “३६ वा दिवस सुरूय आणि लढाई सुरूच आहे. ऑक्सिजन सपोर्ट सुरू आहे पण फुप्फुसे आता हळुहळु बरे होऊ लागले आहेत. डॉ. गोएंकाने सांगितलं, जास्त बोलू नका पण जवळच्या नातेवाईकांच्या संपर्कात राहत जा. चित्रपट आणि शो पाहू शकतो. एखाद्या नवजात बाळाप्रमाणे सध्या मी चालायचा प्रयत्न करतोय. मग सेल्फी तर बनतेच. तुम्हा सगळ्यांचे आभार.”

अनिरूद्ध दवेला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर त्याचे फॅन्स त्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना करताना दिसून आले. फक्त फॅन्सच नव्हे तर इतर सेलिब्रिटीसुद्धा त्याच्या प्रकृतीची चौकशी करताना दिसून येत आहेत. नुकतंच निया शर्माने ट्विट करत त्याची चौकशी केली. यावर रिप्लाय देताना अनिरूद्ध दवे भावूक झाला होता. तिच्या ट्विटला रिप्लाय देताना हात थरथर कापत होते, असं देखील त्याने सांगितलं.

अनिरूद्ध दवे गेल्या एक महिन्यापासून रूग्णालयात करोनाचे उपचार घेतोय. मध्य प्रदेशमध्ये एका शूटिंग दरम्यान त्याला करोना झाला होता. २३ एप्रिल रोजी त्याने करोना झाल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर १४ दिवस त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात येणार असल्याचं देखील त्यावेळी त्याने सांगितलं होतं. परंतू आता ३६ दिवस उलटले तरीही त्याची करोनाविरोधातली झुंज सुरूच आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 5:03 pm

Web Title: covid positive anirudh dave is on road to recovery after coming out of icu prp 93
Next Stories
1 अटकेनंतर अजितच्या डोक्यात सुरु झाली नव्या खेळीची समीकरणं
2 बलात्काराचा आरोप असलेल्या पर्ल पुरीला पाठिंबा देणाऱ्या सेलिब्रिटींवर देवोलीना संतापली!
3 तरला जोशी यांच्या निधनानंतर सहकलाकार निया शर्मा भावूक
Just Now!
X