28 November 2020

News Flash

अखेर दीपिकाने केला खुलासा, ‘पद्मावत’मधील हे दृश्य साकारताना तिचेही डोळे पाणावले

'माझ्या करिअरमधील ते सर्वांत महत्त्वाचे दृश्य होते'

दीपिका पदुकोण

बऱ्याच प्रतिक्षेनंतर संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावत’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. करणी सेनेकडून होत असलेल्या तीव्र विरोधानंतरही चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये मुख्य भूमिका साकारलेल्या दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्या अभिनयाचाही प्रशंसा होता आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिका आणि शाहिदने चित्रपटाविषयी प्रतिक्रिया दिल्या.

राणी पद्मावतीची भूमिका साकारणाऱ्या दीपिकाच्या अभिनयाला प्रेक्षक-समीक्षकांकडून दाद मिळत आहे. संपूर्ण चित्रपटात दीपिकासाठी एक दृश्य खूप खास आहे आणि ते दृश्य साकारताना तिच्याही डोळ्यात पाणी आल्याचे तिने सांगितले. ‘जौहरचे दृश्य माझ्यासाठी खास आहे आणि ते साकारणे आव्हानात्मक होते. माझ्या संपूर्ण करिअरमधील ते सर्वांत महत्त्वाचे दृश्य होते,’ असे तिने म्हटले.

वाचा : ..तर रणवीर करणार ‘जोहर’- ऋषी कपूर

चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनीच जौहरच्या दृश्याबद्दलचे मत मांडले. काहींना अंगावर काटा आणणारे ते दृश्य होते तर काहींचे डोळे पाणावले. भन्साळींच्या चित्रपटातील प्रत्येक दृश्य एखाद्या कलाकृतीप्रमाणेच असते. त्यातील भव्यता प्रेक्षकांचे डोळे दिपवून टाकणारी असते. १८० कोटींचा बजेट असलेल्या ‘पद्मावत’च्याही प्रत्येक दृश्यात ही भव्यता पाहायला मिळत असून येत्या काळात हा चित्रपट किती कमाई करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2018 6:47 pm

Web Title: deepika padukone reveals the scene from padmaavat which is very special and challenging for her
Next Stories
1 ..तर रणवीर करणार ‘जोहर’- ऋषी कपूर
2 ‘या’ चित्रपटात पाच लूकमध्ये दिसणार सलमान
3 जॅकी श्रॉफच्या ‘या’ जॅकेटच्या किंमतीमध्ये तुम्ही घेऊ शकता एक गाडी
Just Now!
X